मुंबई(जनता आवाज वृत्तसेवा):- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठे फेरबदल होणार असल्याची चर्चा सुरु होती. अखेर या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून, आमदार जयंत पाटील यांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली आहे.
जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाच्या मेळाव्यात बोलतांना आपल्याला पक्षाने प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे, असे म्हटले होते. त्यावर बोलताना शरद पवारांनी पक्षातील नेत्यांशी बोलून यावर निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. यानंतर अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.
त्यानुसार आज जयंत पाटील हे प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार झाले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी विधानपरिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.