लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथे एका कुटुंबाने पाणीपुरवठा करणाऱ्या तलावात मैलामिश्रित पाणी सोडण्याची घटना ताजी असतानाच अशा प्रकार आता लोणी येथे एका चिकन विक्रेत्याने चिकनवर लघुशंका करून केलेले चिकन ग्राहकाला विकत असल्याची अतिशय संतापजनक घटना नुकतीच उघडकीस आली आहे.
या अतिशय किळसवाण्या व संतापजनक प्रकाराबद्दल लोणी खुर्द येथील ग्रामस्थांनी आज लोणी खुर्द गाव बंद ठेवून या घटनेचा निषेध केला . त्यानंतर निषेध मोर्चा काढून लोणी पोलीस स्टेशन येथे जाऊन डीवायएसपी शिरीष वमने , पीएसआय कैलास वाघ यांना संबंधितांवर कार्यवाही करण्याबाबत निवेदन दिले. लोणी खुर्द ग्रामपंचायतने या किळसवाण्या घटनेनंतर संबंधित चिकन विक्रेत्याची टपरी तातडीने सील केली व नंतर ती टपरी लोणी खुर्द मधून हटवली.
लोणी खुर्द च्या ग्रामस्थांनी संबंधितावर कड क कारवाई करण्याबाबत जोरदार मागणी केली आहे. या प्रकारानंतर लोणी खुर्द ग्रामस्थ लोणी खुर्द व परिसरातील सर्व मास विक्रेत्यांवर कडी नजर ठेवून आहेत. या प्रकारानंतर काही ग्रामस्थांनी चिकन मटण घेणे व खाणे बंद केले आहे.