कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):-राशीन, ता.कर्जत येथून कत्तलीच्या उद्देशाने डांबुन ठेवलेल्या 16,80,000/- रुपये किंमतीच्या 26 गोवंशीय जनावरांची सुटका, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई करण्यात आली आहे.
मा.पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.नमुद आदेशान्वये पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार सोमनाथ झांबरे, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर व अरूण मोरे अशांचे पथक तयार करुन कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयावर कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथकास रवाना केले.
दि.12 रोजी पथक कर्जत पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदयाची माहिती घेत असताना पथकास गोपनीय माहिती मिळाली की, राशीन गावामध्ये आळसुंदा रोड येथे सचिन मोहन आढाव, रा.राशीन, ता.कर्जत याचे घराचे पाठीमागील काटवनात व हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव, रा.राशीन, ता.कर्जत याचे घरासमोरील पत्र्याचे शेडमध्ये बबलु उर्फ इरफान कुरेशी व त्याचे साथीदारांनी गोवंश जातीचे जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निदर्यतेने डांबुन ठेवले आहेत.पथकाने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीवरून नमूद ठिकाणी छापा टाकला असता घटनाठिकाणी गोवंश जातीचे जिवंत जनावरे निर्दयतेने बांधुन ठेवल्याची दिसून आल्याने घटनाठिकाणावरून 16,80,000/- रूपये किंमतीचे एकुण 26 गोवंश जातीचे जिवंत जनावरे ताब्यात घेण्यात आली आहेत.
महाराष्ट्र राज्यामध्ये गोवंश जनावरांची कत्तल करून गोमांस विक्री करण्यास मनाई असताना कोठून तरी गोवंशीय जनावरांची खरेदी करून आणुन त्यांची कत्तल करण्याचे उद्देशाने विना अन्न पाण्याचे, निदर्यतेने बांधुन ठेवताना मिळून आल्याने 1) हिरामन उर्फ भाऊसाहेब आढाव, पुर्ण नाव माहित नाही, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) 2) सचिन मोहन आढाव, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) 3) बबलु उर्फ इरफान कुरेशी, पुर्ण नाव माहित नाही, रा.राशीन, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) 4) सादीक कुरेशी, पुर्ण नाव माहित नाही, रा.कर्जत, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) 5) समीर कुरेशी, पुर्ण नाव माहित नाही, रा.कर्जत, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर (फरार) यांचेविरूध्द कर्जत पोलीस ठाणे गु.र.नं. 417/2025 महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलम 5 (अ), 5 (ब), 9 सह प्राण्यांना निदर्यतेने वागविणेचे कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास कर्जत पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री.सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर, मा.श्री.गणेश उगले, उपविभागीय पोलीस अधिकारी, कर्जत उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.