लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-महायुती सरकारने सुरू केलेल्या लोक कल्याणकारी योजनांची अंमलबजावणीत शिर्डी मतदारसंघ राज्यात अग्रस्थानी आहे. जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे समाजातील सर्व घटकांना योजनांचा लाभ मिळत असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील यांनी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या वतीने शिर्डी मतदार संघातील ३४१ लाभार्थ्यांना गृह संच भांडे वितरण कार्यक्रमात सौ. विखे पाटील बोलत होत्या. यावेळी परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौ. विखे पाटील म्हणाल्या की केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना या सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचे काम शिर्डी मतदार संघामध्ये विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि जनसेवा कार्यालयाचे समन्वयक हे करत असतात. यामुळे प्रत्यक्ष लाभ हा लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत आहे. शिर्डी मतदार संघामध्ये मंत्री विखे पाटील आणि विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून स्वतंत्र यंत्रणा ही सुरू आहे यामुळे शिर्डी मतदार संघात आणि अहिल्यानगर मध्ये सर्वात जास्त योजना सुरु आहे. महिलांसाठी आज विविध योजना आहे या योजना महिलांनी समजून घेत पुढे जावे. जातीपातीचे राजकारण करण्यापेक्षा सर्वांना विविध योजनेबरोबरच आणि विकास कामाच्या माध्यमातून आधार देण्याचे काम विखे पाटील परिवाराच्या माध्यमातून केले जाते.
आज शासनाच्या जन्मापासून तर मृत्यूपर्यंतच्या विविध योजना आहेत या सर्व योजनेचा लाभ नागरिकांनी लाभ नागरिकांनी घेत असतानाच आपल्या मुलांना चांगले संस्कार आणि चांगले शिक्षण द्यावे. त्याचबरोबर महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन जपावा यासाठी जनसेवा फौंडेशन आपल्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे त्यांनी आश्वासित केले.
आज शेतकरी, सर्वसामान्य जनता, ऊस तोडणी कामगार शिर्डी मतदार संघातील नागरिकांसाठी अपघाती विमा, शिक्षणाच्या विविध सुविधा या निर्माण करत असताना प्रत्येक योजनेचा प्रभावी अवलंब या शिर्डी मतदारसंघांमध्ये होत आहे आणि म्हणूनच शिर्डी मतदार संघ हा विविध योजना राबवण्यात राज्यात अव्वल स्थानावर राहिला आहे.
प्रारंभी प्रस्ताविकामध्ये विखे पाटील कारखान्याचे माजी अध्यक्ष कैलास नाना तांबे यांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून विविध योजना ह्या लोकाभिमुख अनेक घराघरापर्यंत पोहोचत आहेत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ योजनेचे स्वतंत्र अधिकृत नोंदणी आणि मदत कक्ष जनसेवा कार्यालयामध्ये सुरू झाले आहे यांचा राहाता, श्रीरामपूर, राहुरी आणि कोपरगावातील लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे हे कार्यालय सुरू केल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांचे त्यांनी अभिनंदनही केले. यावेळी शिर्डी मतदारसंघातील प्रवरा परिसर,आश्वी परिसर आणि गणेश परिसरातील विविध गावातील ३४१ लाभार्थ्यांना गृह उपयोगी भांडे संच वितरण करण्यात आले.