24.3 C
New York
Friday, July 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

वादळी वाऱ्यामुळे घरांच्या आणि शेत पिकांच्या झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई तातडीने शेतकऱ्यांना द्या – आ. विठ्ठलराव लंघे – पाटील

नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा): – स्वतंञ नेवासा विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी गुरुवार (दि.१७) रोजी पावसाळी आधिवेशनात औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन ते म्हणाले की, माझ्या नेवासा मतदार संघात मे २०२५ मध्ये झालेल्या अवकाळी पाऊसाने शेती पिकांचे प्रंचड नुकसान होवून गोरगरीबांच्या घरांची सोसाट्याच्या वाऱ्याने प्रचंड दाणादान होवून पडझड झालेली आहे तर अवकाळी पाऊसाने नेवासा तालुक्यात कांदा,केळी,सोयाबीन आणि बाजरी या मुख्य पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.

त्यामुळे या नैसर्गिक आपत्तीत नुकसान झालेल्या माझ्या मतदार संघातील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीचा लाभ सरसकट व तात्काळ मिळावा अशी प्रभावी मागणी आमदार विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी गुरुवारी औचित्याचा मुद्दा उपस्थित करुन विधानसभेच्या सभापतींकडे केली आहे त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या नुकसान भरपाईची आशा पल्लवित झाली आहे.

यावेळी आ. विठ्ठलराव लंघे – पाटील यांनी विधानसभेच्या सभापतींचे विशेष लक्ष वेधतांना ते म्हणाले की,माझा नेवासा तालुका हा ग्रामीण स्वरूपाचा भाग असून सुमारे ८० टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे आणि माहे मे आणि जून २०२५ दरम्यान अचानक झालेल्या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवून घरांची पडझड झालेली आहे असा मुद्देसुद प्रश्न सभापतींकडे उपस्थित केल्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा सरकारच्या भूमिकेडे लागून आहेत.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!