कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-आज कोल्हार भगवतीपुर येथील सोनगाव रोडलगत वस्ताद लहुजी साळवे चौक या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली .
याप्रसंगी त्यांच्या फोटोला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. दरम्यान यावेळी कोल्हार भगवतीपूरचे सरपंच दत्तात्रय राजभोज, प्रकाश खर्डे, ज्ञानेश्वर खर्डे, संभाजी देवकर, विष्णुपंत कापसे , प्रवीण लोखंडे,संतोष लोखंडे, बाळासाहेब गायकवाड, दिलीप बोरुडे,श्याम लोखंडे,दत्तू पेटारे, राजेंद्र थोरात, गोरक्षनाथ खर्डे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन लहुजी क्रांती सेना महाराष्ट्र प्रवक्ते सुनील बोरुडे यांनी केले होते.