कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-श्री साई भगवती ग्रुप व ग्रामस्थ यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी (वर्ष 17 वे) श्री भगवती माता मंदिरात श्री साई सच्चरित पारायणाचे आयोजन करण्यात येत आहे.
याच अनुषंगाने श्री साई भगवती ग्रुप व ग्रामस्थ यांची गुरुवार दिनांक 17 जुलै रोजी संध्याकाळी 7 वा. भगवती माता मंदिरात श्रीफळ वाढवून संकल्प बैठक संपन्न झाली.
याप्रसंगी श्रीकांत खर्डे दत्तात्रय राजभोज, धनंजय दळे, गणेश महाराज मुसमाडे, पंढरीनाथ खर्डे, नारायण पगारे ऋषिकेश आंमरे, विकी पाटोळे, राजेंद्र राऊत, संजय दळे, राहुल खर्डे, भरत घुले, सोमनाथ काळे, धनंजय निबे, मयूर बंग,कैलास दिघे, ज्ञानदेव राऊत,सोहम नवाळे तसेच पत्रकार बांधव ग्रामस्थ आदी उपस्थित होते तर या बैठकीस स्वप्निल निबे,आबा खर्डे व ऋषिकेश खांदे यांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला.
यामध्ये प्रामुख्याने जास्तीत जास्त भाविक भक्तांना पारायणाची संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प करण्यात आला. पारायणाची सुरुवात श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी दिनांक 25 जुलै 2025 रोजी तर पारायणाची सांगता 1 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक 10 ते 12 या वेळेत श्री साई कथाकार ह भ प विकास महाराज गायकवाड यांच्या काल्याच्या कीर्तनाने होईल. पारायणाचे व्यासपीठ चालक ह भ प गणेश महाराज मुसमाडे असतील. तसेच दैनंदिन पूजा सुनील काका कुलकर्णी( गुरु ) यांच्या हस्ते होईल. पारायण कालावधीमध्ये रोज सकाळी ठीक 6 वा. श्रींची काकड आरती होऊन सकाळी 7 ते 11 या वेळेत ग्रंथ वाचन व श्रींची आरती होईल. नवीन पारायणार्थींना ग्रंथ उपलब्ध करून दिले जातील तसेच जुन्या पारायणार्थींनी आपले ग्रंथ सोबत आणावेत असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच पारायणा दरम्यान अन्नदान करण्यासाठी इच्छुक अन्नदात्यांनी आपली नावे मंडळाकडे नोंदवावीत.
पारायण सांगत्याच्या दिवशी शुक्रवार दि. 1 ऑगस्ट रोजी सकाळी ठीक 7 वा. अवतरणिका वाचन होऊन त्यानंतर भव्य ग्रंथ पालखी मिरवणूक काढण्यात येईल. तरी जास्तीत जास्त भाविक भक्तांनी साई सच्चरित पारायणस बसून श्री साईबाबांच्या चरणी रुजू करण्याच्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन मंडळाच्यावतीने करण्यात येत आहे . पारायण यशस्वी होण्यासाठी साई भगवती ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ कोल्हार भगवतीपूर प्रयत्नशील आहे.