बीड(जनता आवाज वृत्तसेवा):- सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज दि. 22 जुलै रोजी बीडच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.
मागील झालेल्या सुनावणी दरम्यान वाल्मिक कराडच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आणि संपत्ती जप्तीबाबत युक्तिवाद झाला होता. विशेष सरकारी वकील उज्जवल निकम यांनी त्याला जोरदार विरोध केला. दरम्यान न्यायालयाने दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर त्यावरील निर्णय राखून ठेवला होता. आज यावर सुनावणी झाली.
यावेळी वाल्मिक कराडने केलेल्या दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. तसेच वाल्मिक कराडच्या संपत्ती अर्जावर निर्णय राखून ठेवला आहे. आता पुढील सुनावणी 4 ऑगस्ट रोजी होणार आहे.