27.3 C
New York
Wednesday, July 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

महाराष्ट्र हिंदी परिषदेचे विभागीय सहसचिव म्हणून डॉ. भाऊसाहेब नवले यांची बिनविरोध निवड 

सात्रळ(जनता आवाज वृत्तसेवा);-कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील कला शाखा समन्वयक, सहयोगी प्राध्यापक व हिंदी विभागाचे प्रमुख डॉ. भाऊसाहेब नवनाथ नवले यांची महाराष्ट्र हिंदी परिषद कार्यकारिणीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विभागीय सहसचिव म्हणून डॉ. भाऊसाहेब नवले यांची बिनविरोध निवड झाल्याचे प्रमाणपत्र परिषदेचे प्रधान सचिव डॉ. गजानन चव्हाण यांचेकडून प्राप्त झाल्याचे डॉ. नवले यांनी सांगितले. मालवण येथे संपन्न महाराष्ट्र हिंदी परिषदेच्या ३१ व्या अधिवेशन व राष्ट्रीय चर्चासत्रा दरम्यान डॉ. नवले यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली. सदर निवड ही पाच वर्षाकरिता राहील. निवडणूक अधिकारी म्हणून ज्येष्ठ प्राध्यापक प्रो. डॉ. चंद्रदेव कवडे, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून प्रो. डॉ. पांडुरंग पाटील, प्रो. डॉ. मधुकर खराटे, प्रो. डॉ. जिजाबराव पाटील यांनी काम पाहिले. 

महाराष्ट्र हिंदी परिषद सन १९९० पासून महाराष्ट्रात हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी आणि विकासासाठी काम करणारी एक नोंदणीकृत परिषद आहे. परिषदेच्या माध्यमातून विविध उपक्रम, चर्चासत्रे, कार्यशाळा, पुरस्कार वितरण, प्रकाशन इत्यादी करिता समर्पित आहे. परिषदेचे एक हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत सदस्य आहेत. डॉ. नवले यांच्या हिंदी भाषा आणि साहित्य प्रचारासाठी असलेल्या योगदानाचा विचार करून सदर निवड महत्वाची मानली जाते. डॉ. नवले यांना आतापर्यंत हिंदी भाषा संबंधी लेखनासाठी महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य हिंदी साहित्य अकादमीने ‘वैश्वीकरण और हिंदी का रोजगारोन्मुख परिदृश्य’ या पुस्तकास पं. महावीर प्रसाद द्विवेदी स्वर्ण पुरस्कारासह हिंदी अकादमी, मुंबई या संस्थेचा साहित्यातील मातृभूमि भूषण सम्मान आणि ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचा उत्कृष्ट हिंदी अध्यापन पुरस्कार ही प्राप्त झाले आहेत. डॉ. नवले यांची आतापर्यंत सत्तरोत्तर हिंदी उपन्यासों के नायक, उपन्यासकार अब्दुल बिस्मिल्लाह की संघर्ष चेतना, वैश्वीकरण और हिंदी का रोजगारोन्मुख परिदृश्य, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या ‘विचार तर कराल’ या पुस्तकाचे ‘सोचिए तो सही’ या शीर्षकाने हिंदीत भाषांतर आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदव्युत्तर हिंदी अभ्यासक्रमाकरिता ‘शोध प्रविधि’ या पुस्तकासह एकूण पाच पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विविध संशोधन मासिकाच्या विशेषांकाचे संपादक म्हणून ही डॉ. नवले यांनी काम पाहिले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे दोन संशोधन प्रकल्प डॉ. नवले यांनी पूर्ण केले आहेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्यस्तरीय संशोधन पत्रिकेतून त्यांचे ८० पेक्षा जास्त संशोधन लेख प्रकाशित झाले असून त्यांनी विविध राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे यशस्वी आयोजन ही केले आहे. डॉ. नवले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे पीएच.डी. चे संशोधक मार्गदर्शक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तीन विद्यार्थी संशोधन कार्य करीत आहेत. वर्ष २०१८ पासून २०२१ पर्यंत संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, कोल्हार आणि सात्रळ येथे उप-प्राचार्य म्हणून ही प्रशासनिक कामकाज पाहिले आहे.

या निवडी बद्दल संस्थेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री व अहिल्यानगर चे पालकमंत्री ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री श्री. आण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा इंस्टिट्यूट ऑफ़ मेडिकल सायन्सेस, लोणीचे कुलपति व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. राजेंद्र विखे पाटील, मा. खा. डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेचे सहसचिव श्री. भारत घोगरे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील, अतिरिक्त कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, अतांत्रिक विभागाचे शिक्षण संचालक प्राचार्य डॉ. प्रदीप दिघे, प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे व उप प्राचार्य व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ उप-परिसर समिती सदस्य डॉ. जयश्री सिनगर यांचे सह विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!