जामखेड (जनता आवाज वृत्तसेवा):-अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तसेच घरफोड्या करणार्या व विविध पोलीस स्टेशनला गंभीर गुन्हे दाखल आसलेल्या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात जामखेड पोलीसांना यश आले आहे. जामखेड शहरातील मिलिंद नगर भागातुन या आरोपीस पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की फरार आरोपी ज्ञानेश्वर लिंग्या काळे रा. जांब, ता. भुम. जिल्हा धाराशिव या आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी तसेच घरफोडी व इतर गुन्हे दाखल आहेत. तसेच याच आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनसह कर्जत पोलिस स्टेशन, अहिल्यानगर, सोलापूर तालुका पोलीस स्टेशन, जिल्हा सोलापूर, वाशी पोलीस स्टेशन, तालुका भुम, जिल्हा धाराशिव अशा विविध पोलीस स्टेशनला एकुण सात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. हा आरोपी आनेक महीन्यांन पासुन पोलीसांना चकवा देत फीरत होता.
जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांना शुक्रवार दि 24 जुलै 2025 रोजी गुप्त बातमीदारा मार्फत माहीती मिळाली की वरील गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी हा ज्ञानेश्वर लिंग्या काळे रा. जांब ता. भुम. जि. धाराशिव हा जामखेड शहरातील मिलिंदनगर भागात आला आहे अशी माहिती मिळाली.
यानुसार पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी त्यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर, पो.स.ई किशोर गावडे, पो.कॉ. देवा पळसे, कुलदीप घोळवे, ईश्वर माने, प्रकाश मांडगे यांच्या पथकाला आरोपीस पकडण्यासाठी मिलिंदनगर भागात रवाना केले. यावेळी या ठिकाणी आरोपी ज्ञानेश्वर लिंग्या काळे हा आरोपी मिलिंदनगर भागातील काटवनात स्वताचे अस्तित्व लपवत आहे आसे निदर्शनास आले. याबाबत आरोपीस पोलीस आल्याची चाहुल लागताच तो पळुन जाण्याचा प्रयत्न करीत असतानाच पोलीस पथकाने त्यास पकडले. तसेच त्याची झडती घेतली असता त्याच्या हातात लोखंडी तलवार आढळून आली ती देखील पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आर्म ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे आहिल्यानगर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, कर्जत चे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलीसांच्या पथकाने केली आहे.