25.3 C
New York
Saturday, July 26, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रीय महामार्गावर राहुरीत पुन्हा चार चाकी पलटी ; अनर्थ टळला

राहूरी (जनता आवाज वृत्तसेवा):- राहुरी शहरालगत नगर कोपरगाव राष्ट्रीय महामार्ग मार्गावर आज पहाटेच्या सुमारास मालवाहतूक करणारा ट्रक पलटी झाला.

शिर्डीहून दक्षिणेकडे सफरचंद घेऊन जाणारा मालट्रक राहुरीलगत गाडगे महाराज आश्रम शाळेसमोर आज पहाटेच्या सुमारास पलटी झाला .

रस्त्यावरील स्पीड ब्रेकरचा अंदाज आला नसल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून ट्रक पलटी झाल्याचा अंदाज आहे.

रात्रीच्या गस्तीवर असणाऱ्या पोलिसांनी तात्काळ ११२ क्रमांकाला संपर्क करत घटनास्थळी धाव घेतली . एकेरी वाहतूक वळविण्यात येऊन सकाळपर्यंत मालट्रक मधील सफरचंदाचे खोके काढून जेसीबी ला पाचारण करण्यात आले होते . घटनास्थळी गर्दी झाली होती .

यापूर्वीही याच ठिकाणी वाहने पलटी होण्याचे घटना घडलेल्या आहेत . या ठिकाणी असणारा स्पीड ब्रेकर सूचना फलक नसल्याने व दिशादर्शक नसल्याने वाहन चालकांना स्पीड ब्रेकर व मोठे वळण असल्याने स्पीड ब्रेकर असल्याचाअंदाज येत नसल्याने अपघात घडतात . या रस्त्याचा वापर वाहन चालकांसह विद्यार्थी , ज्येष्ठ नागरिक , महिला करतात . स्पिड ब्रेकर व्यवस्थित नाहीत . त्यावर बाजूला झेब्रा क्रॉसिंग नाही , पांढरे पट्टे नाहीत , रेडियम देखील नाहीत . ते असणे आवश्यक आहे . शिवाय वाहन चालक वेगाने वाहने चालवत असल्याने नियंत्रण सुटण्याची शक्यता असते .

शहरातील बस स्थानक चौकात मल्हारवाडी रोड ते नवी पेठ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची व नागरिकांची वर्दळ असते. या ठिकाणीही झेब्रा क्रॉसिंग स्पीड ब्रेकर होणे अत्यावश्यक आहे . आज पुन्हा चार चाकी वाहन पलटी झाल्याने ठीक ठिकाणी सूचनाफलक लावाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!