23.6 C
New York
Sunday, July 27, 2025

Buy now

spot_img
spot_img

राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचे आव्हान स्विकारून सहकार बळकट करा-ना. राधाकृष्ण विखे पाटील क्रांतीकारी निर्णय सहकार मंत्रालयाने घेतल्याने चळवळीला मोठा दिलासा -सहकार राज्यमंत्री डाॅ पंकज भोयर

अकोले (जनता आवाज वृत्तसेवा):-विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री अमित शहा यांनी जाहीर केलेले राष्ट्रीय सहकार धोरण यशस्वी करण्याचे आव्हान स्विकारून सहकार बळकट करा, सरकार सचिवांना पाठबळ देईल आशी ग्वाही जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

अकोले येथे स्वाभीमानी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायट्यांच्या सचिवांच्या संघटनेचे राज्यस्तरीय अधिवशनाचे उद्घाटन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहकार राज्यमंत्री डाॅ पंकज भोयर यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.आ.डॉ किरण लहामटे आ.अमोल खताळ आ.सत्यजीत तांबे जिल्हा बँकेचे व्हा चेअरमन माधवराव कानवडे सचिव संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे जिल्हा उपनिंबधक मंगेश सुरवसे यांच्यासह सहकारी संस्थाचे प्रतिनिधी आणि राज्यातून आलेले सचिव उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की सेवा सहकारी सोसायटी समोर असलेल्या प्रश्नाचा यापुर्वी गांभीर्याने कधीच विचार झाला नाही.परंतू देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयामुळे देशातील सहकार चळवळीला भक्कम पाठबळ मिळत आहे.२०४७ पर्यत विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यात सहकार चळवळीचे योगदान महत्वपूर्ण ठरणार असल्याने सेवा सहकारी सोसायटीच्या कार्यपद्धतीला पाठबळ देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेला आधार आणि सहकारातून रोजगार निर्मिती करण्याचे धोरण केंद्र सरकारचे असल्याचे त्यांनी सांगितले.

सेवा सहकारी सोसायटीच्या वाटचालीचा इतिहास खूप मोठा आहे.परंतू ज्या उद्दीष्टांसाठी या संस्थाची सुरूवात ते पूर्ण होवू शकले नाही.आव्हनात्मक परीस्थितीला सामोरे जावून सोसायट्यांचा कारभार सुरू आहे.त्यामुळे संस्थांना उत्पनाचे मार्ग उपलब्ध करून देण्याचे धोरण मोदी सरकारचे असून सोसायट्या आता मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व्यवसाय सुरू शकतील.

सोसायटीच्या माध्यामातून केवळ गावपातळीवर राजकारण झाले.त्यामुळे अर्थिक विकासाचे केंद्र बनण्याऐवजी सोसायट्या राजकारणाचे अड्डे बनल्या आशी खंत व्यक्त करून सोसायटी तोट्यात असली तरी संचालक होण्याची धडपड थांबत नाही.संचालकांच्या राजकारणात सचिवाचा बळी जातो.ही परीस्थिती बदलण्याची गरज आहे याकरीता सचिवांचे भविष्य घडविण्यासाठी पेन्शन योजना लागू करता येईल का याचाही विचार करण्याची सूचना त्यांनी केली.

सोसायट्यांचे मानांकन करून त्याच्या दर्जा प्रमाणे बॅकींग प्रणालीशी जोडून घेण्याचे प्रयत्न झाले तर सोसायट्यांना व्यवसायाची साखळी निर्माण होईल.चळवळीच्या उज्वल भवितव्याची सुरूवात झाली त्यामुळे सहकार चळवळ बळकट करा सरकार तुम्हाला पाठबळ देईल असे विखे पाटील यांनी आश्वासित केले.

सहकार राज्यमंत्री डाॅ पंकज भोयर यांनी आपल्या भाषणात क्रांतीकारी निर्णय सहकार मंत्रालयाने घेतल्याने चळवळीला मोठा दिलासा मिळाला आहे.राज्याच्या काही भागात सहकारात चांगले काम झाले.विदर्भात मात्र स्वाहाकार झाला.तुम्ही जबाबदारीने काण करता त्यामुळे तुमचे प्रश्न सोडविण्याची जबबादारी सरकार  घेत आहे.मंत्रालयात यासाठी बैठक घेण्यात येणार असून सहकार चळवळीत असलेल्या त्रिस्तरीय रचनेत सोसायट्यांना नव्या सहकार धोरणात प्राधान्य देण्यात आल्याचे मंत्री भोयर असे सांगितले.

याप्रसंगी आ.सत्यजित तांबे यांनी संगमनेर अकोले तालुक्यातील सहकार चळवळीची पार्श्वभूमी सांगून सहकार चळवळीमुळे शेतकरी जगला.सचिवांच्या मागण्यासाठी केलेल्या पाठपुरव्याची माहीती दिली.

आ.किरण लहामटे यांनी सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील असे सांगून राज्य सरकार चांगल्या पध्दतीने काम करीत असल्याने प्रश्नाची सोडवणूक निश्चीत होईल असे सांगितले.संघटनेचे अध्यक्ष गणेश रेवगडे यांनी सचिवाचे प्रश्न प्रास्ताविकातून मांडले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!