राहाता (जनता आवाज वृत्तसेवा):-डोऱ्हाळे, कोऱ्हाळे, वाळकी, गोरक्षवाडी, मोरेवाडी या गावांमध्ये पाणी येईल, असा विचारसुद्धा लोकांनी स्वप्नात केला नव्हता. मात्र सखोल अभ्यास करून लाभक्षेत्रातील शेवटच्या गावापर्यंत पाणी पोहोचवण्याचे कार्य नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून पूर्ण करता आले.
आपले विरोधक, विपरीत विचार करणारे आणि काही हितचिंतक देखील म्हणत होते की या गावांना पाणी मिळणार नाही. मात्र, हे कार्यकर्त्यांच्या आशावादाचा आणि संघर्षाचा विजय आहे. विरोधकांच्या सातत्यपूर्ण टीकेच्या पार्श्वभूमीवर हे यश म्हणजे आपला खरा विजय आहे. अशक्य वाटणारे काम आपण शक्य करून दाखवले,असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी नमूद केले.
राहाता तालुक्यातील मोरवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणाली व संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे लोकार्पण पद्मश्री विठ्ठलराव विखे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
या कार्यक्रमास कैलास नाना तांबे पाटील, मारुती पाटील, डॉ. सोमनाथ गोरे, शेटे साहेब, प्रकाश गोरे, संतोष गोरडे, मच्छू पाटील निळवंडे प्रकल्पातील लाभार्थी शेतकरी, ग्रामस्थ, तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. सुजय विखे म्हणाले निळवंडे लाभक्षेत्रातील कोणताही शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही. विधानसभा निवडणुकीत दिलेले वचन आम्ही केवळ एका वर्षात पूर्णत्वाच्या दिशेने नेले आहे. पाण्याचा शब्द दिला होता, त्यातील ८०% काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम देखील लवकरच पूर्ण करून पाणी प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणार
एक विशेष अनुभव सांगून डॉ. विखे म्हणाले डोराळे गावातील जलपूजनाच्या कार्यक्रमात दोन ज्येष्ठ नागरिक भेटले. त्यांनी विचारलं, तुम्ही आम्हाला ओळखता का?’ मी नाही म्हणालो. त्यांनी सांगितलं की, ‘गेल्या १८ वर्षांपासून आम्ही नेहमी तुमच्या विरोधात मतदान करत होतो. पण आमच्या गावात पाणी येईल, हे स्वप्नातही वाटलं नव्हतं. ते स्वप्न तुम्ही पूर्ण केलं. आता मरेपर्यंत तुमच्या सोबत राहू अस यावेळी त्यांनी सांगितलं आपल्या कामातून मतपरिवर्तन घडताना पाहिलं आहे. ४० वर्षांपासून पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा विजय आहे, आणि आजचा दिवस त्यांना समर्पित आहे.
गणेश कारखान्याच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. काही लोकांना वाटलं की आता आम्हाला महाराष्ट्राच्या राजकारणाच्यातून पटलातून बाजूला करता येईल. तशी रणनीती आखली गेली, पण इथल्या गोरगरीब जनतेच्या आशीर्वादाने आम्ही पुन्हा ७० हजार मतांनी विधानसभेला निवडून आलो. विरोधकांनी संपूर्ण ताकद लावूनही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर उभे राहिलो आणि विजय मिळवला. आज मी विरोधकांना सांगू इच्छितो विकासाच्या बाजूने रहा आणि तुम्हीही विकासाच्या सोबत या.”
डॉ. विखे पुढे म्हणाले, “काही लोकांनी केवळ बोगद्यात फोटो काढले, हेल्मेट घालून पाण्याखाली हात वर करून केवळ नाटक केलं. मात्र शेवटी खऱ्या अर्थाने पाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मिळालं असल्याचे त्यांनी सांगितले.