राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पोलीस पथकाने आज सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या किराणा दुकानावर छापा टाकला असून गुटक्यासह मावा बनवण्याची मशीन असा सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त एका आरोपीला ताब्यात घेतल्याने अवैध व्यवसायिकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अहिल्यानगर येथील विशेष पोलीस पथकाने आज शनिवारी सकाळी राहुरी खुर्द येथील पवन ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकला असता तेथे अवैधरित्या मावा बनवण्याची मशीन,सुपारी, मावा,विमल पानमसाला,गोवा पानमसाला,असा एकुण सुमारे साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त करत एका आरोपींना ताब्यात घेतले असून दुपारी उशिरा राहुरी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.पवण उर्फ पृथ्वीराज दगडुसिंग गिरासे ( रा. राहुरी खुर्द) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील कर्मचाऱ्यांचे पवन गिरासे यांना अभय असल्याचे बोलले जात आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश चाहे, दिगंबर कारखिले,सुनिल पवार, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर,उमेश खेडकर, दिनेश मोरे, अजय साठे, अमोल कांबळे, दिपक जाधव आदींच्या पथकाने ही कारवाई केली आहे.