मुंबई(जनता आवाज वृत्तसेवा) :- प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी मंत्री बच्चू कडू यांना 2018 साली घडलेल्या प्रकारात अडथळा निर्माण करणे आणि कर्मचाऱ्याला धमकी देण्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवत मुंबई हायकोर्टाने शिक्षा सुनावली आहे.
हे प्रकरण तब्बल सात वर्षांपूर्वीचे असून न्यायालयाने कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा आणि १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.