पारनेर (जनता आवाज वृतसेवा): – निघोज परिसरातील पठारवाडी येथे चोरट्यांनी उच्छाद मांडला असून कुकडी कालव्यालगत पाणी उपसा करण्यासाठी शेतकऱ्यांनी ठेवलेले कृषी वीज पंप फोडून त्यातील तांब्याच्या तारा व वीज वाहक वायर चोरून नेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
सध्या पावसाळा असून ही पावसाने दडी मारल्यामुळे पिके करपून गेली आहेत . त्यात शेतकऱ्यांनी कांदा चाळीत ठेवलेल्या कांद्याला माती मोल मिळत असल्याने शेतकरी प्रचंड आर्थिक संकटात सापडला आहे . भरीस भर म्हणून पठारवाडी येथील शेतकरी निलेश पठारे , सुनिल पठारे , सुनिल सुपेकर , शंकर ढवळे व इतरांनी शेतातील पिकांसाठी पाणी देण्यासाठी कुकडी कालव्यावर कृषी वीज पंप बसवलेले होते . हा परिसर निर्मुष्यु असल्याने येथील पंप अज्ञात चोरांनी रात्री च्या वेळी वीज पंप फोडून त्यातील तांब्याच्या तारा , त्याच बरोबर पंपा साठी वीज वाहक वायर ही चोरट्यांनी लंपास केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे .
या आधी निघोज , पठारवाडी , जवळा , गाडीलगाव , गुणोरे , कोहोकडी , म्हसे , राळेगण थेरपाळ , सांगवी सूर्या व परिसरात चोरट्यांनी चोरी केल्याच्या घटना घडल्या आहेत . पण पोलीसांचे ” लंबे हात ” काही चोरांपर्यंत पोहचत नाही व चोर ही पोलीसांच्या हातावर तुरी देऊन नेहमी सारखे पसार होतात . त्यामुळे चोरट्यांचे ही धाडस वाढले आहे , यात मात्र नुकसान होते .