25.7 C
New York
Friday, August 15, 2025

Buy now

spot_img
spot_img

तेलंगाणा येथील साई भक्तांकडून साईचरणी १७ लाख ७३ हजार ८३४ रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू केले दान

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-श्री साई बाबांवरील अपार श्रद्धा आणि भक्तीने प्रेरित होऊन देश-विदेशातील भाविक विविध स्वरूपात देणगी अर्पण करत असतात. त्याच भावनेतून हैद्राबाद, तेलंगाणा येथील रहिवाशी साईभक्त डॉ. जी. हरीनाथ आणि श्रीमती जी. पुष्‍पलता यांनी श्री साईचरणी एकूण १७ लाख ७३ हजार ८३४ रुपये किमतीच्या सोन्या-चांदीच्या वस्तू अर्पण केल्या.

यामध्ये १९१.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे ताट आणि २८३ ग्रॅम वजनाचे चांदीचे अगरबत्ती स्टँड यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, हे अगरबत्ती स्टँड अत्यंत आकर्षक आणि सुंदर नक्षीकामाने सजलेला असून त्यावर श्री साईबाबांची अमूल्य शिकवण – “श्रद्धा” आणि “सबुरी” – नाव सुंदर अक्षरांत लावले आहे, त्यामुळे ते भक्तीचा आणि कलाकुसरीचा अद्वितीय संगम दिसत आहे.

सदरची देणगी प्राप्‍त झाल्‍यानंतर श्री साईबाबा संस्थानच्‍यावतीने मुख्य कार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सन्मानपूर्वक सत्कार केला.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!