24.6 C
New York
Saturday, August 16, 2025

Buy now

spot_img
spot_img

साईबाबा संस्‍थानकडून श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा

शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिरात रात्री १० ते १२ वाजता हभप स्मिता आजेगावकर यांचे श्रीकृष्‍णजन्‍म कीर्तन होवुन श्रीकृष्‍ण जन्‍मोत्‍सव साजरा करण्‍यात आला. 

यावेळी संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्‍यकार्यकारी अधिकारी भिमराज दराडे, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, पुजारी, कर्मचारी व साईभक्‍त उपस्थित होते. त्‍यानंतर श्रींची शेजारती झाली.

तसेच काल सकाळी १० ते १२ यावेळेत श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडप स्‍टेजवर हभप सौ. आजेगावकर यांचे काल्‍याचे कीर्तन झाले. कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य पारेश्‍वर बाबासाहेब कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली.

यावेळी मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, मंदिर प्रमुख विष्‍णु थोरात, मंदिर पुजारी, कर्मचारी, शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर काल रात्री ९ वाजता श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सवानि‍मित्‍त श्रींच्‍या रथाची गावातुन मिरवणुक निघाली व रथाची मिरवणुक परत आल्‍यानंतर शेजआरती संपन्‍न झाली.

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेला श्री गोकुळाष्‍टमी उत्‍सव आनंदमय व भक्‍तीमय वातावरणात पार पडला

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!