पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तहसील कार्यालयात ७९ वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा आ . काशिनाथ दाते यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव चेडे, तहसिलदार गायत्री सौंदाणे, निवासी नायब तहसीलदार दिपक कारखिले, महसूल नायब तहसिलदार डॉ. आकाश किसवे, निवडणूक नायब तहसिलदार श्रीकांत लोमटे यांच्यासह मंडलाधिकारी, महसूल कर्मचारी, सार्वजनिक बांधकाम विभाग , पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सकाळी तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा सोहळा आयोजित करण्यात आला. आ . काशिनाथ दाते यांनी ध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण केले.
तहसिलदार गायत्री सौंदाणे यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व अधोरेखित करत, देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी महसूल विभागातील कर्मचारी व पोलीस दलाने संचलनाद्वारे मानवंदना दिली. सर्व उपस्थितांनी राष्ट्रगीताच्या सामूहिक गजरात देशभक्तीचा उत्साह अनुभवला.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी तहसिल कार्यालयातील सर्व कर्मचारी व अधिकारी यांनी परिश्रम घेतले. स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने झालेल्या या कार्यक्रमाने उपस्थितांमध्ये देशप्रेम, ऐक्य आणि स्वातंत्र्याच्या मूल्यांचे नव्याने स्मरण झाले.