कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील कोल्हार बु| येथील बालगोकुलम् ॲकेडमीमध्ये आज कृष्ण जन्माष्टमीचा दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
बालश्रीकृष्ण प्रतिमापूजन व आरती अध्यात्मिक परिवारातील स्वामी समर्थ महाराज सेवेकरी सौ.पल्लवी धनवटे व लक्ष्मीबेन पटेल , माता पालक संघांच्या शुभांगी थेटे व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.
प्रतिमा पूजनानंतर पल्लवी धनवटे यांनी दहीहंडीतील काल्याचा प्रसाद श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांसोबत निस्वार्थ भक्ती आणि प्रेम यांच्या रूपाने खात असत,प्रत्यक्ष ३३ कोटी हा प्रसाद मिळवण्यासाठी भूतलावर येत असत.एकदा इंद्रदेव यांना सुद्धा काल्याच्या प्रसादापासून भगवंतांनी कसे वंचित ठेवले ही गोष्ट बालगोपालांना समजावून सांगितली.
आज बालगोपाल नटूनथटून श्रीकृष्ण व राधा यांच्या वेशभूषेत खूपच सुंदर आणि मनमोहक दिसत आहे. पालकांनी सुद्धा कृष्णजन्माष्टमी सारख्या सांस्कृतिक उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या मुलांना संस्कार देण्यासोबत संस्कृती टिकवणे व जपणे खूप महत्त्वाचे आहे.आज आपली शाळा तुम्हा सर्वांच्या उपस्थितीमुळे खरंच वृंदावनच दिसत आहे असे उद्गार शाळेचे मुख्याध्यापिका शारदा मोरे मॅडम यांनी काढले.
श्रीकृष्णा व राधा यांच्या वेशभूषेत बालगोपालांनी विविध नृत्य सादर केले व शेवटी मानवी मनोरा तयार करून , गोविंदा आला रे आला. हाथी घोडा पालखी जय कन्हैया लाल की.. असे गाणे गात दहीहंडी फोडली.
वरील कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे संचालक प्रा.सोन्याबापू मोरे ,मुख्याध्यापिका शारदा मोरे सहशिक्षिका जयश्री गडाख, प्रतीक्षा कोल्हे, भाग्यश्री राऊत, सीमा लोखंडे, सानिया सय्यद, दीक्षा खरात यांनी परिश्रम घेतले व जमलेल्या सर्व पालकांनी ,नागरिकांनी या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक केले.