20 C
New York
Monday, August 18, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्रीरामपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नवी प्रभाग रचना जाहीर

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- आगामी नगरपरिषद निवडणुकीसाठी श्रीरामपूर शहरात नवी प्रभाग रचना निश्चित करण्यात आली असून या रचनेनुसार एकूण ३४ नगरसेवक निवडून दिले जाणार आहेत. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रभाग रचनेवर हरकती व सूचना नोंदविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या नव्या रचनेनुसार अनेक विद्यमान नगरसेवकांना आपले पारंपरिक मतदारसंघ बदलावे लागणार असून काहींना नव्या भागात आपला राजकीय पाया शोधावा लागणार आहे.

प्रभाग १ : लोकसंख्या ५७०७ – झिरंगे वस्ती, सोनावणे वस्ती, गुरुनानक नगर, लक्ष्मीनारायण नगर, महादेव मंदिर परिसर, फातिमा हौसिंग सोसायटी, आरसीसी साठवण तलाव, डावखर लॉन परिसर.

प्रभाग २ : लोकसंख्या ५५३२ – एज्युकेशन हायस्कूल परिसर, आंबेडकर कॉलनी, अण्णाभाऊ साठे नगर, सेंट बापटीस्ट चर्च, वैदु वाडा, वडार वाडा, कंपोस्ट डेपो, गिरमे वस्ती, सुतावणे परिसर, शेडगे मळा, अचानक नगर, जुने तहसील, मिनी स्टेडियम.

प्रभाग ३ : लोकसंख्या ५४९९ – तहसील कार्यालय परिसर, सेंट लुक हॉस्पिटल, रेव्हेन्यू कॉलनी, सिद्धार्थ नगर, बोरावके नगर, आरबीएनबी कॉलेज परिसर, आशीर्वाद नगर.

प्रभाग ४ : लोकसंख्या ५७८५ – आदर्श नगर, पंजाबी कॉलनी, गाडगे बाबा उद्यान, भाऊराव कर्मवीर चौक, कुरेशा मोहल्ला, तांबे चाळ, लक्ष्मी थिएटर, सिंधी कॉलनी, शिरसाठ हॉस्पिटल, इराणी मोहल्ला, महात्मा फुले सोसायटी, सेंट झेविअर्स स्कूल परिसर.

प्रभाग ५ : लोकसंख्या ५५८८ – काझी बाबा रोड, नेहरू नगर झोपडपट्टी, बागवान गल्ली, गुलाम रसूल मस्जिद परिसर.

प्रभाग ६ : लोकसंख्या ५४७० – संजय नगर, ईदगा परिसर, डी.एम. मुळे शाळा, राम नगर, मिल्लत नगर, जुने साठवण तलाव परिसर.

प्रभाग ७ : लोकसंख्या ५७७७ – वैदु वाडा, बजरंग चौक, गौसिया मस्जिद, रोहिदास नगर, धनगर, गोपीनाथ नगर, मधुलता गार्डन, संजय नगर पाणी टाकी.

प्रभाग ८ : लोकसंख्या ५७६४ – सैय्यद बाबा दर्गा, बीफ मार्केट, सुभेदार वस्ती, कुरेशी मोहल्ला, शाळा क्र. ४ व ५, पाप जलाल रोड, मरकस मस्जिद रोड परिसर.

प्रभाग ९ : लोकसंख्या ४८४१ – बस स्टँड, खटोड मार्केट, शिवाजी चौक, रेल्वे स्टेशन, पोस्ट ऑफिस, कामगार हॉस्पिटल, काँग्रेस भवन, राम मंदिर, भाजी सोनार मार्केट.

प्रभाग १० : लोकसंख्या ४७८८ – रेल्वे मालधक्का, कांदा मार्केट, भीमनगर, शिवाजी नगर, खिलारी वस्ती, औद्योगिक वसाहत.

प्रभाग ११ : लोकसंख्या ४७८७ – चौधरी वस्ती, वढणे वस्ती, उत्सव मंगल कार्यालय, थत्ते ग्राउंड, मोरगे हॉस्पिटल परिसर.

प्रभाग १२ : लोकसंख्या ४८६९ – नगरपरिषद कार्यालय, जिजामाता चौक, सावता रोड, कुंभार गल्ली, गिरमे चौक, कालिका मंदिर परिसर, के.व्ही. रोड, जुनी घास गल्ली, स्मशानभूमी परिसर व झोपडपट्टी.

प्रभाग १३ : लोकसंख्या ४८६५ – वडार वाडा, बाजार तळ, शिकलकरी परिसर, तलवार रोड, कॅनललगत झोपडपट्टी, खटोड बालिका विद्यालय, दादा जोशी शाळा परिसर.

प्रभाग १४ : लोकसंख्या ५१६७ – रिमांड होम, गजानन वसाहत, दहावा ओटा, हिंदुस्थान बेकरी, नॉर्दन ब्रांच, चुना भट्टी व झोपडपट्टी, जवाहर कारखाना, गुलमोहर हॉटेल, द्राक्ष माळा रोड परिसर.

प्रभाग १५ : लोकसंख्या ५०२२ – जनता हायस्कूल, सिद्धिविनायक मंदिर, प्रवरा हौसिंग, नामदेव हौसिंग, कानिफनाथ मंदिर रोड, लक्ष्मी आई मंदिर रोड, नवशक्ती रोड परिसर.

प्रभाग १६ : लोकसंख्या ४९२७ – निवारा हौसिंग, आगाशे हॉस्पिटल, म्हाडा कॉलनी, बोरावके नगर, पाटणी मळा, रासकर नगर, बोंबले नगर, चित्तरकथी मोहल्ला, मोरागे वस्ती, काळाराम मंदिर, दिनेश स्कूटर रोड.

प्रभाग १७ : लोकसंख्या ४८९४ – विजय हॉटेल, पूर्णावत नगर, समता कॉलनी, मुळा प्रवरा कार्यालय, अशोक थिएटर, शिंदे, लबडे वस्ती परिसर.

या नव्या प्रभाग रचनेमुळे काही भागात लोकसंख्या वाढली तर काही ठिकाणी कमी झाली आहे. यामुळे मतदारसंघाचे स्वरूप बदलल्याने विद्यमान नगरसेवकांचे राजकीय गणित ढवळून निघण्याची शक्यता आहे. काहींना आपल्या मजबूत बालेकिल्ल्यातून दूर जावे लागेल तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकते. नगरपरिषद निवडणुकीसाठी आता उलटगणती सुरू झाली असून पुढील काही दिवसांत या रचनेवर येणाऱ्या हरकती व सूचनांवर अंतिम निर्णय झाल्यानंतरच निवडणुकीची खरी रंगत दिसून येणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!