श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- काँग्रेस नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धमकी देणाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी श्रीरामपूर विधानसभा काँग्रेस कमिटीच्या वतीने आमदार हेमंत ओगले आणि प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस करण ससाणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी करण ससाणे म्हणाले की, की, वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या संत परंपरेतून उगम पावलेला आणि जन माणसाला मार्गदर्शन करणारा अध्यात्मिक प्रवाह आहे समानतेचा, भक्तीचा आणि नैतिकतेचा संदेश देणारा हा संप्रदाय जनतेच्या जीवनावर सकारात्मक परिणाम घडवत आला आहे याची सर्वांना जाण आहे आणि त्याबद्दल आपण सर्वजण आदरभावही बाळगतो, मात्र संत महंतांची मोठी परंपरा असलेल्या अध्यात्मिक क्षेत्रातील व्यक्तीने अशा प्रकारे आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल असे वक्तव्य करणे चुकीचे असल्याचे म्हटले जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष सचिन गुजर म्हणाले की, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, भेदाभेद भ्रम अमंगळ ही संतांची शिकवण आहे याउलट जर कोणी धर्माच्या नावाखाली समाजात द्वेष मत्सर पसरवत असेल तर तो व्यक्ती वारकरी संप्रदायाचा असू शकत नाही माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बद्दल उद्घाटपणे बोलणे अप्रत्यक्षरीत्या जीवे मारण्याची धमकी देण्यासारखे बोलणे निषेधार्थ असून वारकरी संप्रदायाला गालबोट लावणारे आसल्याचे म्हटलें
ज्ञानेश्वर मुरकुटे म्हणाले की, सहकार, सामाजिक, शिक्षक कृषी संस्कृती यासह सगळ्या क्षेत्रात थोरात परिवाराने केलेले कार्य बहुमोल आहे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय भाऊसाहेब थोरात व त्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सिद्ध केलेले वेगळेपण समाज मनात खोलवर रुजलेले असल्याचे प्रतिपादन केले,
बाबसाहेब दिघे यांनी बोलतांना सांगितले की, काँग्रेस नेते थोरात यांना धमकी देणाऱ्या प्रकाराचा आम्ही तीव्र निषेध करत असून संबंधितांवर तातडीने कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
सदर निवेदनावर तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, माजी नगरसेवक रमेश कोठारी, अशोक बागुल, जनार्धन जगधने, महंता यादव, अशोक उपाध्ये, कांतीभाई पटेल, ॲड.समिन बागवान, सुहास परदेशी, शंकरराव गायकवाड,शाम अडांगळे,प्रसाद चौधरी, डॉ. राजेंद्र लोंढे, विलास पुंड, भारत भवार, रावसाहेब आल्हाट,भोला दुग्गल, अशोक जगधने, रज्जाक पठाण, रणजीत जामकर, सुनील साबळे, रियाज खान पठाण,आय्याज तांबोळी, रितेश एडके, सरबजीतसिंग चुग, सनी मंडलिक, बाबा वायदंडे, शाहरुख शेख,वैभव कुऱ्हे,अमोल आवटे, गणेश काते, विशाल साळवे, अशोक साळवे, सुभाष येवले, काकासाहेब रणवरे, दादा रणवरे, किरण खंडागळे, सुरेश बनसोडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.