18.3 C
New York
Thursday, August 21, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्व शंकरनाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशनतर्फे अपघातग्रस्तांना आर्थिक मदत 

कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार येथील ॲड सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या निवासस्थानी  एका छोटेखाणी कार्यक्रमात नगर मनमाड रोडच्या दुरावस्थेमुळे एक महिन्याच्या अंतरात मृत्युमुखी पडलेल्या दोनही कुटुंबीयांना मानवतेच्या भावनेतुन कोल्हार येथील स्व.शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशन च्या माध्यमातून आर्थिक मदत करण्यात आली.

यामध्ये कोल्हार येथील फळ विक्रेते सलीम भाई शेख तसेच राहुरी फॅक्टरी येथील आप्पासाहेब वरखेडे यांना प्रत्येकी 21 हजार रुपये चेकच्या स्वरूपात कोल्हार बुद्रुकचे माजी सरपंच ॲड सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

दरम्यान ॲड सुरेंद्र खर्डे पाटील आपले मनोगत म्हणाले की स्व.शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित मोरे यांच्या संकल्पनेतूनच आपतग्रस्त कुटुंबियांना मदत करण्यात येत आहे.

तसेच सर्वप्रथम त्यांनी आपतग्रस्त कुटुंबीयांची तसेच सर्व समाज बांधवांची माफी मागितली ते म्हणाले की मी यापूर्वीच महामार्गाच्या कामासंदर्भात आक्रमक भूमिका घ्यायला हवी होती मी त्याच वेळी रोडवर उतरलो असतो तर कदाचित आपतग्रस्तांचे प्राण वाचले असते परंतु आता यापुढे आम्ही हे कदापि सहन करणार नाही केवळ शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे एखादी व्यक्ती आपले प्राण गमावत असेल किंवा त्या व्यक्तीला कायमचेअपंगत्व येत असेल तर याची सर्वस्वी जबाबदारी ही राज्य सरकारची तसेच त्या संबंधित शासकीय यंत्रणेचे असेल आणि त्यासाठी आम्ही भविष्यात न्यायालयीन लढा देखील लढणार आहोत. त्यासाठी या यंत्रणावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासही मागे पुढे पाहणार नाही.

यावेळी कोल्हार येथे वारंवार होणारी वाहतूक कोंडी निवारण्यासाठी येथील निस्वार्थपणे सेवा देणारे पोलिस मित्र रामराजे शंकर गायकवाड व होमगार्ड सिकंदर भाई( बबड्या भाई ) यांचा देखील त्यांच्या या सेवेबद्दल प्रत्येकी 5000 रुपयांचा चेक यावेळो सुरेंद्र भाऊंच्या हस्ते देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला . दरम्यान रामराजे शंकर गायकवाड यांनी मनाचा मोठेपणा दाखवत मिळालेला 5000 रुपयांचा चेक ताबडतोब नगर मनमाड रोडवरील प्रवरा नदीच्या पुलावर मृत पावलेले फळ विक्रेते सलीम भाई शेख यांच्या कुटुंबीयांना मदत म्हणून देत असल्याचे जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे जमलेल्या सर्वांनी कौतुक केले. तसेच राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोडवर मृत पावलेले आप्पासाहेब वरखेडे यांच्या राहत्या घरी राहुरी फॅक्टरी येथे जाऊन त्यांच्या कुटुंबीयांना देखील 21 हजार रुपयांचा चेक

ॲड. सुरेंद्र खर्डे पाटील यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी देखील त्या कुटुंबीयांच्या भावना अनावर झाल्या होत्या. निस्वार्थ भावनेने केलेल्या या आर्थिक मदतीमुळे शंकर नाना खर्डे पाटील सामाजिक प्रतिष्ठान व शिवधन फाउंडेशनचे अध्यक्ष अजित मोरे यांनी एक अनुकरणीय पायंडा घालून दिल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

याप्रसंगी व्यापारी पतसंस्थेचे अध्यक्ष संजय शिंगवी, प्रगतशील शेतकरी अनिल खर्डे पाटील, उद्योजक निलेश शिंगवी,अतुल रांका, अमोल खर्डे, राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड रोड साठी वीस वर्षांपासून सातत्याने लढा देणारे अजित येवले प्रशांत मुसमाडे,सुनील विश्वासराव तसेच पत्रकार बांधव आदी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!