श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):- दै.जयबाबाचे संपादक ॲड. बाळासाहेब आगे यांना जिवे मारण्याची धमकी देणारा आरोपी मोकाट असल्याने त्याला तातडीने अटक करावी आणि आगे यांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घार्गे यांच्याकडे श्रीरामप्रातील पत्रकार संघटनांनी केली आहे.
श्रीरामपुरात नशेचे इंजेक्शन पकडल्यानंतर त्याचा गुन्हा दाखल झालेला असताना आणि त्याची पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बातमी प्रकाशित केल्यानंतर इन्स्टाग्रामवर गणेश मुंढे नावाच्या नशेच्या इंजेक्शन प्रकरणातील आरोपीने थेट मारण्याची धमकी दिली. याकडे एसपी घार्गे यांचे लक्ष वेधत सदर प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होताच १० मिनीटात त्या आरोपीने इन्स्टाग्रामवरील धमकीचा मेसेज डिलीट केला. याचा अर्थ त्याचे लागेबांधे कोठे आहे? हे शोधावे, ‘म्हतारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकायला नको, पोलीस दादापेक्षा कोणी दादा नाहीं, हेच कारवाई करून सिद्ध करावे, अशी मागणी करत सुनील मुथ्था यांनी आरोपी मोकाट असल्याने आगे यांच्या जिवीताला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी सर्वांची मागणी असल्याचे सांगितले.
पत्रकार संघटनांची एसपी घार्गेकडे मागणी :
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, कार्याध्यक्ष विष्णू वाघ, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, रमण मुथ्था, रमेश कोठारी, बद्रीनारायण वढणे, भास्करराव खंडागळे, सुनील मुथ्था, महेश माळवे, नागेश सावंत, नवनाथ कुताळ, अनिल पांडे, सुनील नवले, प्रदीप आहेर, रवि भागवत, देविदास देसाई, दिलीप दायमा, सुरेश कांगणे, मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे, उपाध्यक्ष सलिम पठाण, हरिभाऊ बिडवे, अशोक रणनवरे, मोहन जगताप, दिलीप लोखंडे, विकास बोर्डे, एकनाथ डांगे, संदीप शेरमाळे, राजेंद्र भोसले, एजाज सय्यद, शफीक शेख, सुहास शेलार, विष्णूपंत डावरे, संतोष बनकर, सचिन उघडे,नितीन चित्ते, चंद्रकांत लांडगे, रामेश्वर आरगडे, बापूसाहेब नवले, तानाजी लामखेडे, अर्जुन राऊत, स्वामीराज कुलथे आदी यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख घार्गे यांना निवेदन देण्यासाठी श्रीरामपूर पत्रकार संघ, श्रीरामपूर प्रेस क्लब, श्रीरामपूर मराठी पत्रकार संघ, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच इतर पत्रकार संघटनांचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.
पत्रकारांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसपी सोमनाथ घार्गे यांनी याबाबत योग्य ती दखल घेवून कारवाई केली जाईल, असे सांगितले.