अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- एका गांजा प्रकरणात मदत करण्याकरिता लाचेची पाच लाखांची मागणी करत दीड लाखावर तडजोड करत पैसे घेताना रंगेहाथ कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहायक फौजदार राजेंद्र प्रभाकर गर्गे (राहणार समर्थ नगर सावेडी) आणि अशोक रामचंद्र गायकवाड (वय 71, वर्षे व्यवसाय शेती, राहणार बिशोब लॉइड कॉलनी सावेडी, जिल्हा अहिल्या नगर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेऊन तोफखाना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या घटनेने अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.