20.4 C
New York
Friday, August 22, 2025

Buy now

spot_img
spot_img

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून निरीक्षकांची नियुक्ती

मुंबई(जनता आवाज वृत्तसेवा) :- भारतीय संविधानातील कलम ३२४ अंतर्गत प्रदत्त अधिकारांचा वापर करून भारताच्या निवडणूक आयोगाने (ECI) उपराष्ट्रपती निवडणूक २०२५ साठी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या कार्यक्रमानुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ९ सप्टेंबर  रोजी मतदान व मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी निरीक्षक म्हणून सुशीलकुमार लोहानी, आयएएस (ओडिशा कॅडर : १९९५), अतिरिक्त सचिव, पंचायती राज मंत्रालय आणि डी. आनंदन, आयएएस (सिक्कीम कॅडर : २०००), अतिरिक्त सचिव, वित्त मंत्रालय (व्यय विभाग) यांची नियुक्ती केली आहे.

याशिवाय, नितीनकुमार शिवदास खाडे, आयएएस (आसाम-मेघालय कॅडर : २००४), संयुक्त सचिव, ग्रामीण विकास मंत्रालय (भूमी संसाधन विभाग) यांना राखीव यादीत स्थान देण्यात आले आहे.

उपराष्ट्रपती निवडणुकीचे संपूर्ण आयोजन पारदर्शक आणि सुरळीत पार पडावे, यासाठी निवडणूक आयोगाकडून या नियुक्ती करण्यात आल्या असल्याचे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!