26.9 C
New York
Saturday, August 23, 2025

Buy now

spot_img
spot_img

पर्यावरण पूरक गणेशमूर्ती बनवा कार्यशाळेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश.. प्रवरेतील हजारो विद्यार्थ्यांचा कार्यशाळेत सहभाग

लोणी(जनता आवाज वृत्तसेवा):-पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. यासाठी सर्वांचाच पुढाकार आणि योगदान हे महत्त्वाचा आहे. याच दृष्टीने लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून मागे मागील काही वर्षापासून पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेचा आयोजन केले जाते. या माध्यमातून प्रवरा शैक्षणिक संकुलातील चाळीस हजाराहून अधिक विद्यार्थी यामध्ये प्रत्यक्ष सहभागी आहेत. या माध्यमातून बनवलेल्या मूर्तींची स्थापना ही विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांच्या घरी केली जाते.

संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पाटील, आणि संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षणाबरोबरच संस्कारक्षम शिक्षण आणि विविध सणवाराची माहिती विद्यार्थ्यांना शालेय पातळीवरती मिळवण्यासाठी विविध उपक्रम प्रवरेच्या शाळा महाविद्यालयांमध्ये सुरू असतात. श्री गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रवरेच्या सर्वच शाळा महाविद्यालयांमध्ये सध्या पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळा सुरू आहेत. शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांच्या माध्यमातून सर्व गुण संपन्न विद्यार्थी घडू शकतो यामुळे पर्यावरण पूरक गणेश मूर्ती कार्यशाळेमध्ये विद्यार्थी कलाशिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या पालकांचाही सहभाग यामध्ये घेतला जात आहे. यासाठी संस्थेच्या माध्यमातून कला शिक्षकांना गणेश मूर्ती बनवण्याचे विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे आज शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून या प्रशिक्षणातून अनेक विद्यार्थ्यांनी सुंदर अशा कलात्मक बाप्पांची कलाकृती साकार होत आहे. शाडूच्या मातीपासून मूर्ती कशी तयार करावी हे प्रात्यक्षिकाद्वारे दाखवण्याबरोबरच प्लास्टर ऑफ पॅरिस पासून प्रदूषण कसे होते हे विद्यार्थ्यांना पटवून दिले जाते. या कार्यशाळेच्या माध्यमातून मुलांच्या आई-वडिलांच्या हस्तकलेचाही विकास होऊन कलागुणांना वाव मिळत आहे.

संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या संकल्पनेतून सहकारातून समृद्धीकडे हा गणेश उत्सव सांस्कृतिक परंपरा म्हणून आणि सांस्कृतिक ठेवा म्हणून साजरा केला जातो. मागील तीन-चार वर्षापासून गणेश उत्सवाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी एकत्र येत आदर्श गणपती बाप्पांचे आगमन, गणपती बाप्पा विसर्जन मिलवणूक आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून सहकारातून समृद्धीकडे हा संदेश देतांना कला सस्कृती, गडकिल्ले संवर्धन,संत परंपरा,देश भक्ती,सामाजिक एकात्मता यांसह

विविध क्रिडा स्पर्धा, पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने प्रत्यक्ष कृतीतून संदेश दिला जातो. प्रेरणादायी अशीच ठरत आहे. यामध्ये तयार झालेल्या मूर्तींची स्थापना विद्यार्थी आपल्या घरामध्ये करत पर्यावरणाचा संदेश हा थेट शाळेपासून विद्यार्थ्यांच्या घरापर्यंत पोहोचत आहे. यासाठी सर्व शाळा महाविद्यालयातील प्राचार्य, कलाशिक्षक विद्यार्थी आणि पालकांचाही सहभाग हा वाढत आहे.

याबाबत संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे म्हणाल्या,पर्यावरणाचा संदेश हा शालेय पातळीवरील विद्यार्थ्यांना दिल्यास तो त्यांच्या घरापर्यंत जातो आणि ह्या संदेशाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन हे चांगल्या प्रकारे होत असते. म्हणूनच विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. मागील वर्षी संपन्न झालेली गणेश विसर्जन मिरवणूक ही विश्वविक्रम ठरली या माध्यमातून टाळ मृदूग, ढोल -ताशा, पावली,लाठी काठी शिवकालीन खेळ,विविध वेशभुषा, सहकारांचा संदेश देणारा रथ, या माध्यमातून विद्यार्थी हा शिक्षणाबरोबरच ज्ञान संस्कृती आणि आपली परंपरा यातूनही तो पुढे गेला पाहिजे त्याच्या कलागुणांना संधी मिळाली पाहिजे हाच उद्देश प्रवरेचा कायम राहिला आहे असे डाॅ. विखे पाटील यांनी सांगितले.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे,प्रवरा कृषि शास्ञ संस्थेचे संचालक डाॅ.उत्तमराव कदम, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे डॉ. महेश खर्डे आदींसह सर्व कलाशिक्षक, सांस्कृतिक प्रमुख सर्व प्राचार्य विद्यार्थी ,पालक, शिक्षक आणि गावोगावची ग्रामस्थ यांचे मोठे योगदान लाभत मिळते.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!