शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):-मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचे अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांनी आपल्या रक्ताचे थेंब वापरून कॅनव्हास वर बनवून घेतलेले शिवसेनाप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे पेंटिंग संगमनेर दौऱ्याप्रसंगी त्यांना भेट दिले आहे निष्ठावान शिवसैनिकाने भेट दिलेले पेटिंग स्वीकारताच रक्ताच्या थेंबाने चित्र रेखाटायचे नाही..असं जाधव यांना ते म्हणाले त्यावर साहेब आमचे तुमच्यावर खूप प्रेम श्रद्धा व निष्ठा आहे. तुमच्या कार्यासमोर माझ्या रक्ताचा थेंब काहीच नाही.. असे म्हणत जाधव यांनी साहेबांना वाकून नमस्कार केला तर उपमुख्यमंत्र्यांनी स्मित हास्य करत या पेंटिंगचा स्वीकार केला.
यानंतर माध्यमांशी बोलताना वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव म्हणाले की यापूर्वी शिवसेना तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेतून व मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेतले आहेत रक्तदानातून अनेकांना जीवनदान प्राप्त होते त्यामुळे अशी उपक्रम पक्षमार्फत घेतलेच आहे मात्र पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे रात्रंदिवस राज्यातील जनते करीता तसेच विकास कामांकरता महत्त्वपूर्ण योगदान देत असतात त्यांच्या या योगदानाला व कार्याला सलामी म्हणून मी रक्ताचे काही थेंब वापरून त्यांचे रेखाटलेले चित्र बनवून घेतले ते त्यांना भेट देताना मला खूप मोठा आनंद झाला व समाधान लाभलेले आहे.
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्ष निर्मिती करून संपूर्ण राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे व विविध आजारांवर उपचारार्थ आर्थिक मदत उपलब्ध करून आधारस्तंभ बनलेले माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अपार निष्ठा असणारे मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र जाधव यांनी आपले रक्ताचे थेंब वापरून शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून त्यांना भेट देत आपल्या नेत्यावरील निष्ठा व प्रेम व्यक्त केले आहे
अहिल्यानगर वैद्यकीय मदत कक्षाचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जाधव यांनी स्वतःचे रक्त देऊन त्याद्वारे निर्मळ या कलाकारा कडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कॅनव्हास पेंटिंग बनवून घेतले रविवार रोजी संगमनेर येथील एका कार्यक्रमात जाधव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांना सदरचे पेंटिंग भेट दिली.
त्यानंतर प्रतिक्रिया देताना वैद्यकीय मदत कक्षाचे जितेंद्र जाधव म्हणाले की आमचे नेते माझे श्रद्धास्थान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब सर्वसामान्य जनतेबरोबर राज्यातील गरजू लाखो रुग्णांना आजार प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षातून कोट्यवधी रुपयांची मदत केली आहे. माझे प्रेरणास्थान व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून व या कक्षाचे राज्याचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्या सहकार्याने पहिल्या नगर जिल्ह्यात सुमारे 12 कोटी रुपयांची वैद्यकीय सहाय्यता मदत करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले आहे.
विकास कामांबरोबरच नागरिकांच्या आरोग्याची खऱ्या अर्थाने काळजी घेणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम देवदूता सारखेच आहे रक्ताचा प्रत्येक थेंब अनमोल असतो या थेंबाचा वापर जीवनदानासाठी केलाच पाहिजे मात्र जीवनदानाबरोबरच मी नेत्यावरील माझ श्रद्धा रक्ताच्या थेंबा पेक्षाही जास्त आहे त्यामुळे मी माझे स्वतःचे रक्ताचे काही थेंब देऊन हे कॅनव्हास पेंटिंग बनवून घेतले असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र जाधव यांनी दिली हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांना प्रेरित होऊन जितेंद्र जाधव हे बालपणापासूनच शिवसैनिक म्हणून कार्यरत आहे.