अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा) :- श्री संत साईबाबा यांच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या शिर्डी नगरीत साईभक्तांना अध्यात्मिक ऊर्जा मिळत असते. या महान परंपरेतून प्रेरणा घेत साई द्वारका सेवा ट्रस्ट, साईदास परिवार व ॲड. धनंजय जाधव मित्र मंडळाच्यावतीने आयोजित संगीतमय श्री साई चरित्र कथेच्या सहाव्या दिवसाची महाआरती डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाली.
यावेळी बोलताना डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले की, “शिर्डीची भूमी ही साक्षात साईबाबांच्या कृपेने धन्य झाली आहे. बाबांचा साक्षात्कार व चमत्कार हजारो भाविकांनी अनुभवला आहे. साईबाबा हे श्रद्धा व सबुरीचे मूर्तिमंत प्रतीक आहेत. त्यांच्या शिकवणुकीतून मानवतेचा खरा धर्म प्रकट होतो. आजही त्यांच्या कृपेने भाविकांच्या जीवनातील संकटे नाहीशी होतात. आयोजक ॲड. धनंजय जाधव यांनी या भक्तिमय कार्यातून शहरातील समाजजीवनात धार्मिक वातावरण निर्माण केले आहे, हे कौतुकास्पद आहे. ६व्या दिवसाच्या प्रवचनात ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी श्री साईबाबांच्या चरित्रातील अध्यात्मिक पैलू श्रोत्यांसमोर मांडले. “बाबांचे जीवन हे मानवतेसाठी उपकारक ठरले आहे. त्यांनी सांगितले त्यापेक्षा कृतीतून दाखविले. गोरगरीबांना अन्नप्रसाद दिल्याशिवाय स्वतः भोजन करत नसत. आजही बाबांची उदी हे दुःख निवारणाचे अद्वितीय साधन आहे. पण त्यासाठी श्रद्धा व सबुरी आवश्यक आहे.”असे महाराजांनी सांगताच उपस्थित साईभक्त भारावून गेले.
महाराजांनी साई आरतीवर सुंदर विवेचन करत “ज्याचे शिर्डी लागली पाय, त्याचे टळतील सर्व अपाय” या ओवीचा संदर्भ देत भाविकांना अध्यात्मिक आधार दिला. ६व्या दिवसाच्या या धार्मिक कार्यक्रमाला अनेक मान्यवर व भाविकांनी उपस्थिती लावली.
यामध्ये डॉ. सुजय विखे पाटील,याप्रसंगी विचार भारतीचे राजाभाऊ मुळे, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वाल्मिक कुलकर्णी, हिराकांतजी रामदासी,आजचे अन्नदाते नगरसेविका शितल जगताप, मा.उपमहापौर अनिल बोरुडे, शिवाजीआण्णा कराळे, निखिल वारे, संजय चोपडा, गणेश कवडे, नितीन कुंकूलोळ, माणिकराव गुगळे, आप्पासाहेब शिंदे ,आयएमएचे डॅा.सचिन पांडुळे, डॉ.सुनिल बोठे, डॉ. पारस कोठारी, राजुमामा जाधव, विजयकुमार बोरुडे, भागवत महाराज दळवी, अशोकराव गायकवाड, सीए गौरव गुगळे, पोपटराव कुलकर्णी, वैभव सांगळे ,कानडे सर, नगरसेविका आशाताई कराळे, पुष्पाताई बोरुडे, अभिमन्यु जाधव, उदय कराळे, दत्ता गाडळकर, संपत नलावडे, महेश तवले, करण डापसे, कैलास गर्जे, रुद्रेश अंबाडे, महेश लोंढे, कैलास शिंदे, आनंद पुंड, चेतन आरकल, अभिजीत बोरुडे, चंदूशेठ मेहेत्रे, शिवदत्त पांढरे, सतीश म्हस्के,भैय्या ढोरे, करण कराळे, आकाश सोनवणे, ओंकार लेंडकर, आदेश गायकवाड, तसेच शहर व परिसरातील हजारो साईभक्तांची गर्दी झाली होती. या संगीतमय कथेच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्ये भक्तिमय व अध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. सहाव्या दिवशी भाविकांच्या मनात “शिर्डीचं साक्षात्कारच इथे उतरलं आहे” असा अनुभव आला.
सहाव्या दिवसाच्या महाआरतीनंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक अॅड. धनंजय जाधव यांनी उपस्थित भाविकांचे आभार मानत सांगितले की, साईबाबांच्या शिकवणुकीतूनच समाजातील ऐक्य, सद्भावना व माणुसकी जोपासता येईल. नागरिकांनी मोठ्या संख्येने कथेचा लाभ घेतला हे साईबाबांच्या कृपेचे द्योतक आहे.



