25.2 C
New York
Thursday, August 28, 2025

Buy now

spot_img
spot_img

चिंचोलीच्या परिसरात सुपाऱ्यांसह तंबाखूचे पकडले १४ ट्रक एलसीबी पथकाची कारवाई; ८ कोटी ४३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राहुरी (जनता आवाज वृत्तसेवा) :- कर्नाटक राज्यातून अहमदाबादच्या दिशेने जात असलेल्या १३ सुपारी व १ तंबाखूचा ट्रक अहिल्यानगर स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पकडले आहेत. 

कर्नाटक राज्यातील ट्रक चालकांकडून १४ वाहने पोलिसांच्या हाती लागले असल्याने मोठे रॅकेट उघडकीस होण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक तपास करत आहे.

अहिल्यानगर एलसीबीचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर सुगंधी सुपारी तंबाखू गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार असे की, हे सर्व ट्रक कर्नाटक येथून अहमदाबादकडे जात होते. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर कोल्हार खुर्द येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई असल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. सदर ट्रक सध्या राहुरी पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू असून जवळपास ६,१७,८५००० रुपये किमतीची २,०५,९५० किलो लाल सुपारी, १५,६०,००० रुपये किमतीची ७८०० किलो तंबाखू व २,१०,००,००० रुपये किमतीचे १३ वाहने असा एकूण ८,४३,४५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

ही कारवाई अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे.

या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहायक फौजदार रमेश गांगुर्डे, हवालदार राहुल द्वारके, पोलीस नाईक गायकवाड, भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माळणकर, राहुल डोके, पोलीस हवालदार गणेश लबडे, सतीश भवर, संतोष खैरे व अमृत आढाव यांचा समावेश होता.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!