लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे गेल्या दोन महिन्यापासून पिंजऱ्याला हुलकावणी देणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. लोणी बुद्रुक म्हस्के वस्ती येथील माजी मंत्री, जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या वस्ती शेजारील शेतामध्ये लावलेल्या पिंजाऱ्यामध्ये ९ ते १० वर्ष वयाच्या मादी बिबट्या जेरबंद करण्यात वनविभाग व प्राणीमित्र यांना यश आले.
गेल्या काही महिन्या पासुन दोन बिबट्यांचा मुक्त संचार परीसरात वाढला होता व परिसरातील पाळीव कुत्र्यांचा या बिबट्यांनी फडशा पाडला होता. म्हणुन डॉ. प्रमोद म्हस्के पाटील यांनी पिंजाऱ्याची मांगणी केली होती त्यांनतर वनविभागाने तात्काळ पिंजरा उपलब्ध करून दिला.
सुरुवातील भक्ष म्हणुन कोंबड्या ठेवल्या पण बिबट्या ऐवजी मुंगसांनी ६ कोंबड्यांचा फडशा पाडला. म्हणुन डॉ. प्रमोद म्हस्के पाटील यांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी भक्ष म्हणुन एक शेळी खरेदी केली. आणि दोन महिन्यापासून रोज संध्याकाळी शेळी पिंजऱ्यात ठेवणे व सकाळी घरी आणणे तसेच पिंजऱ्याची जागा बदलणे हा उद्योग चालु होता. पण आज पिंजऱ्यातून शेळी बाहेर काढल्यानंतर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप मारून शेळी ठार केली परंतु कामगारांनी अरडाओरड केल्याने मृत शेळी सोडुन बिबट्या शेजारच्या ऊसात पळून गेला.
सदर घटनेची माहिती प्राणीमित्र विकास म्हस्के यांना देण्यात आली. माहिती मिळताच प्राणीमित्र व वनरक्षक प्रतिक गजेवर घटना स्थळी गेले. मृत शेळी चा रीतसर पंचनामा करून ज्या ठिकाणी शेळी मारली त्या ठिकाणी पिंजरा लावुन त्यात मृत शेळी ठेवली. आणि संध्याकाळी ७: ३० वाजता सकाळची केलेली शिकार शोधत बिबट्या आला आणि अलगत पिंजऱ्यात जेरबंद झाला.
संध्याकाळी ७:३० वाजता पिंजाऱ्याचा दरवाजा पडला व मोठा आवाज झाला म्हणून कामगारांनी पाहिले तर बिबट्याचा गुरगुरण्याचा आवाज आला.बिबट्या जेरबंद झाल्याची खात्री पटताच रमेश घोलप यांनी तात्काळ प्राणीमित्र विकास म्हस्के यांना माहिती दिली.
माहिती मिळताच प्राणीमित्र ताबडतोब घटणास्थळी पोहचले व घटनेची माहिती अहील्यानगरचे उपवनसंरक्षक अधिकारी श्री धर्मवीर शालविठ्ठल, सहाय्यक उपवनसंरक्षक श्री गणेश मिसाळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री निलेश रोडे ,वनरक्षक प्रतिक गजेवर यांना माहिती दिली.
माहिती मिळताच वनरक्षक गजेवार घटना स्थळी येवून पंचनामा करून पिंजरा हलविण्याची कार्यवाही केली.यावेळी माजी मंत्री श्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, डॉ नानासाहेब म्हस्के पाटील उपस्थित होते.
दरम्यानच्या काळात बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परीसरात पसरल्यामुळे बघ्यांची खुप मोठी गर्दी जमली होती ही गर्दी पांगवण्यासाठी प्रकाश दिघे, भारत म्हस्के, अजय बोधक, रमण म्हस्के, प्रविण विखे, भुषण म्हस्के, गोकुळ म्हस्के, अर्जुन विखे, मधुकर म्हस्के, एकनाथ म्हस्के, अजित म्हस्के, निलेश म्हस्के, अरुण म्हस्के,सुधिर कडू, अनिल म्हस्के, संदीप म्हस्के, प्रभाकर म्हस्के, दत्तू म्हस्के यांनी मदत केली.