कोल्हार (जनता आवाज वृत्तसेवा):- शनिवार दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कोल्हार येथील बाभळेश्वर नगर रस्त्यावर येथील दांपत्य अरुण राजभोज व संगीता राजभोज राहणार पाटिलबा नगर, कोल्हार बुद्रुक हे आपल्या मुलीच्या सासरी शिरूर पुणे येथे भेटीसाठी निघाले होते,आपल्या घरापासून बस स्टॅन्ड कडे पायी जात असताना येथील कोल्हार टेक्स्टाईल दुकानासमोरील बाभळेश्वर कोल्हार रस्त्यावरवरून अचानक पणे दोन दुचाकी स्वार मागून आले व काही कळायच्या आतच त्यांनी गळ्यातील गंठण हिसकावून घेतले व येथील राजुरी रोडच्या दिशेने पलायन केले.
त्यातील एकाने पांढरा टी-शर्ट व काळी जीन्स तर दुसऱ्याने निळ्या कलरची जीन्स घातली होती. दिवसाढवळ्या भरस्त्यावर अशा पद्धतीने अचानकपणे गंठण हिसकावून घेण्याच्या प्रकारामुळे दोन्ही दांपत्य घाबरून गेले. त्यांनी ताबडतोब लोणी पोलीस स्टेशनल गाठले व आपली फिर्याद नोंदवली.
दरम्यान साधारण दीड तोळ्याचे हे गंठण असून ते लोक समोर आले तर मी त्यांना स्पष्टपणे ओळखू शकेल असे संगीता राजभोज म्हणाल्या. भर दिवसा हा प्रकार घडल्यामुळे चोरांची हिम्मत किती वाढली आहे यावरून स्पष्ट होते तरी लवकरात लवकर याचा तपास लावावा अशी मागणी राजभोज कुटुंबीय तसेच येथील नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान येथील राजुरी रोडचे सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता दुचाकी वरील दोघेजण राजुरी रोडच्या दिशेने गेल्याचे दिसते. पुढील तपास PSI आशिष चौधरी करत आहे. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसांसमोर एक नवीन आव्हान समोर उभे राहिले आहे.