श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-आज श्रीरामपूरात स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरच्या पथकाने श्रीरामपूर रेल्वे उड्डाणपूल जवळ हरेगाव फाटा येथे सापळा रचून पाच गावठी कट्टे, त्याचबरोबर नऊ काडतुसे व पल्सर मोटारसायकल जप्त करत त्याचबरोबर तीन आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.
दि. 02 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत छापा टाकून तीन संशयितांना पकडण्यात यश मिळविले आहे.
पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखाली पोहे.कॉ. पंकज व्यवहारे, पोहे.कॉ. अतुल लोटके, पोहे.कॉ.उमेश खेडकर, पोहे.कॉ. दिगंबर कारखेले व पोहेकॉ. मल्लिकार्जुन बनकर, पोहे.काँ. दिपक घाटकर, पोहे.काँ. फुरकान शेख, पोकाँ प्रशांत राठोड, पोकाँ विशाल तनपुरे, चास. फौ उमाकांत गावडे, यांनी पथकासह रेल्वे उड्डाणपुलाजवळ, हरेगाव फाटा, ता. श्रीरामपूर येथे सापळा रचून कारवाई केली.
छाप्यात खालील आरोपी ताब्यात घेण्यात आले त्यांची नावे अक्षय उर्फ भावड्या संजय माळी, (वय 23 वर्षे, रा. फत्तेपुर, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) अजय शिवाजी मगर, (वय 25 वर्षे, रा. नांदुर शिखरी, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) योगेश मच्छिंद्र निकम,( वय 35 वर्षे, रा. वडगांवगुप्ता, ता. नगर, जि. अहिल्यानगर) या सर्वांना ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला एकूण ५ गावठी पिस्टल (अग्निशस्त्र) ९ जिवंत काडतुसे, पल्सर मोटारसायकल क्र. एमएच 17 डीजी 5767 असा एकूण मुद्देमाल किंमत – ४,०९,०००/- रुपये प्राथमिक चौकशीत आरोपींकडील शस्त्रे विक्रीसाठी आणल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा 1959 कलम 3/25, 7/25 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
हि कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे.