20 C
New York
Friday, September 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

हिंदूंवर हल्ले सहन न करता सडेतोड उत्तर द्या! – आ. संग्राम जगताप कानवडमधील हिंदू जन आक्रोश मोर्चात हिंदुत्ववादी आ.संग्राम जगताप यांची तोफ धडाडली

कोल्हापूर(जनता आवाज वृत्तसेवा):– जीहादी वृत्तीने हिंदूंवर केलेले हल्ले व अत्याचार आम्ही सहन करणार नाही. त्याच क्षणी सडेतोड उत्तर द्या!, अशा शब्दांत अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी गर्जना केली.

शिरोळ तालुक्यातील कानवड येथे झालेल्या हिंदू आक्रोश मोर्चात त्यांनी प्रखर शब्दात मनोगत व्यक्त केले. अलीकडेच अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबावर काही जिहादी वृत्तीच्या नागरिकांनी केलेल्या जीवघेणा हल्ल्याचा व घरफोडीचा तीव्र निषेध व्यक्त करत त्यांनी संताप व्यक्त केला. या मोर्चात उपस्थित नागरिकांच्या जयघोषाने वातावरण दणाणून गेले होते. आ. जगताप यांच्या प्रभावी भाषणाने सभा गाजली. अक्षय कोळी व कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी सकल हिंदू समाज त्यांच्या पाठीशी उभे राहत असल्याचे आ.जगताप यांनी सांगितले.

आ.संग्राम जगताप म्हणाले, जिहादी विचारसरणीच्या समूहाकडून नेहमीच हिंदूंवर विनाकारण हल्ले व अत्याचार केले जातात. त्यामुळे हिंदूंच्या संरक्षणासाठी एकजूट करून लढा देणे गरजेचे आहे. त्याकरिता हिंदू समाजात जनजागृती करून अन्यायग्रस्त कुटुंबांना संरक्षण देत जिहादींच्या हिंदूवरील हल्ला व अत्याचाराला सडेतोड उत्तर द्या, असे आवाहन केले.

आमदार संग्राम जगताप पुढे म्हणाले की, हिंदू बंधू अक्षय कोळी यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर झालेला हल्ला हिंद समाज कधीही सहन करणार नाही. या अत्याचाराला उत्तर नक्कीच दिले जाईल. ज्या पद्धतीने अत्याचार होईल त्याच पद्धतीने हिंदू समाज इथून पुढे सडेतोड उत्तर देईल.

हभप संग्राम भंडारे महाराज बोलताना म्हणाले की, इस्लामी सत्ता निर्माण करण्यासाठी हिंदूंवर जाणीवपूर्वक अत्याचार करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आपले रक्षण करण्यासाठी हिंदू समाज एकवटला पाहिजे. त्यासाठी हिंदुत्वाच्या संघटनेने प्रत्येक गावात गल्ली गोळात जाऊन जनजागृती केली पाहिजेत. येणाऱ्या काळात हिंदूंवर झालेल्या अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, ही दाखवण्याची वेळ आली आहे. अक्षय कोळी व त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी संपूर्ण हिंदू समाज आहे. त्याची दखल प्रशासनाने घेऊन तात्काळ अक्षय कोळी यांच्यावर अत्याचार करण्यासाठी कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने शिरोळचे तहसीलदार अनिलकुमार केळकर यांना निवेदन देण्यात आले. कानवाढ प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, पीडित कुटुंबाला तातडीने न्याय द्यावा, भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वादी संघटनांचे पदाधिकारी आणि सकल हिंदू समाज यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होता.

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!