करंजी (जनता आवाज वृत्तसेवा):- पाथर्डी नगर रस्त्यावरील बारा बाभळी गावाजवळील पुलावर सोमवारी एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने या बसने ॲम्बुलन्सला पाठीमागून जोराची धडक दिल्याने ॲम्बुलन्समधील डॉक्टर जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.पैठण डेपोची पैठण सातारा ही बस पैठणहून नगरमार्गे साताऱ्याकडे जात असताना बाराबाभळी तालुका नगर येथील पुलावर या एसटी बसचे अचानक ब्रेक फेल झाले.
त्यामुळे पुढे चाललेल्या बोधेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ॲम्बुलन्सला या बसने पाठीमागून धडक दिल्याने ॲम्बुलन्स मधील डॉक्टर जखमी झाले मात्र ॲम्बुलन्समधील पेशंट सुरक्षित राहिले.
या अपघातामध्ये एसटी बस व ॲम्बुलन्सचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर संदीप पालवे, सुधीर उजागरे,सामाजिक कार्यकर्ते सुधीर वायकर, बापू झुंबड यांच्यासह स्थानिक नागरिकांनी देखील तात्काळ मदतीला येऊन जखमींना पुढील उपचारासाठी नगरकडे रवाना केले.