कोल्हार(जनता आवाज वृत्तसेवा):-कोल्हार येथील व्यापारी पतसंस्था तसेच व्यापारी असोसिएशन व ओम शांती सेंटरच्या माध्यमातून शिक्षक दिन साजरा करण्यात आला.येथील ओम शांती सेंटरच्या नव्यानेच बांधण्यात आलेल्या भव्य मेडिटेशन हॉलमध्ये हा सोहळा पार पडला .
यावेळी येथील विशेष करून निवृत्त शिक्षकांच्या अनुभवातून समाजातील उपेक्षित वर्गाला तसेच सामाजिक समस्येला न्याय देण्याच्या दृष्टीने विचार मंथन करण्यात आले. विशेषतः कचऱ्याची समस्या अथवा पाण्याची समस्या किंवा शैक्षणिक दृष्ट्या एखाद्या विशेष विषयात पारंगत असलेल्या शिक्षकांचे मार्गदर्शन या तसेच इतर अनेक विषयात या निवृत्त शिक्षकांना कसे सहभागी करता येईल याबाबत सविस्तर चर्चा झाली.
दरम्यान शिक्षक हे जरी रिटायर झाले असले तरी ते टायर्ड झाले नसल्याचे प्रतिपादन येथील व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन श्री संजय शिंगवी यांनी यावेळी केले. त्यांच्या अनुभवाच्या माध्यमातून वेगवेगळे सामाजिक प्रश्न सोडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला व त्यांच्या या कल्पनेला जमलेल्या निवृत्त शिक्षकांनी भरभरून दाद दिली.
येणाऱ्या काळात आम्हाला या प्रवास सामील केले तर येणाऱ्या काळात निश्चितच भरीव कामगिरी करण्याचे आश्वासन निवृत्त शिक्षकांच्या प्रतिनिधींनी यावेळी दिले.भारतीय जैन संघटना व मुथा फाउंडेशनचे अहिल्यानगर विभाग प्रमुख संजय शिंगवी यांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली मूल्यवर्धन प्रणालीचे शिक्षण प्रत्येक शाळेत पहिली ते दहावीपर्यंत देण्याचे कार्य सुरू आहे. मूल्य आधारित शिक्षण असल्याने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होऊन समाजामध्ये त्याची एक वेगळी छाप पडत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
दरम्यान अतिशय दिमागदार झालेल्या या सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्धविकास मंत्री मा. आण्णासाहेब म्हस्के पाटील स्टेज वर उपस्थित होते. याप्रसंगी त्यांच्यासोबत कोल्हारच्या ब्रह्मकुमारी विश्वविद्यालयाचे संस्थापक शिवाजी भाई शेजूळ उर्फ आप्पा, देवळाली ओम शांती सेंटरच्या संचालिका विजया बहेनजी, कोल्हार ओम शांती सेंटरच्या संचालिका स्वाती दिदी, सोनगाव सेंटरच्या संचालिका पदमा दिदी, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन संजय शिंगवी, उदयोजक योगेश कोळपकर उपस्थित होते.
दरम्यान याप्रसंगी प्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. पद्मा बहेण यांनी प्रास्ताविक केले. ओम शांती सेंटरच्या संचालिका विजया दिदी यांनी शिक्षक दिनानिमित्त डॉ.राधाकृष्णन यांच्या जीवनावर मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरी विद्यालयाच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या ज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले. जास्तीत जास्त संख्येने ओम शांती सेंटरवर येऊन या ज्ञानाचे महत्व समजून आपल्या जीवनात शांती ज्ञान आनंद वाढवण्याचे आवाहन त्यांनी यावेळी सर्वांना केले.
माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के यांनी देखील सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या या ज्ञानदानाच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या विश्वबंधुत्व व विश्वशांती साठी जगभर चाललेल्या कार्याबद्दल गौरव उद्गार काढले व जास्तीत जास्त संख्येने या ज्ञानदानाच्या कार्याशी जोडून जीवनात परमानंद प्राप्त करून घेण्याचे आवाहन केले.
यावेळी कोल्हार सेंटरतर्फे अण्णासाहेब म्हस्के पाटील यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान यावेळी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या कोल्हार सेंटरच्या संचालिका स्वाती दीदी सोनगाव सेंटरच्या संचालिका पदमादिदी देवळाली प्रवरा सेंटरच्या संचालिका विजया दीदी, अर्चना दीदी सविता दीदी शेख बहेनजी यांचा देखील अण्णासाहेब म्हस्के यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तदनंतर जमलेल्या सर्व निवृत्त शिक्षक शिक्षिका तसेच सध्या कार्यरत असलेले शिक्षक शिक्षिका यांचा देखील त्यांच्या या ज्ञानदाणाच्या कार्याबद्दल शिक्षक दिनाच्या निमित्ताने व्यापारी असोसिएशन तसेच व्यापारी पतसंस्था कोल्हार व ओम शांती सेंटर कोल्हार यांच्यातर्फे विशेष भेट वस्तू व सौगात देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी ओम शांती सेंटरचे साधक, व्यापारी असोसिएशनचे सदस्य शिक्षक वृंद व ग्रामस्थ आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.