अहिल्यानगर(जनता आवाज वृत्तसेवा):-विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमिताने नागरिकांशी थेट संपर्क साधून त्यांच्या अडचणी सोडवण्याचे आणि शासन योजना त्याच्यापर्यत पोहचविण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन आमदार व संयोजक मंगेश चव्हाण यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमिताने आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमिताने आ.मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि जिल्हा प्रशासन यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.तसेच जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत बैठक घेवून आ.मंगेश चव्हाण यांनी विविध योजनांची माहिती समाजातील शेवटच्या माणसाला देण्यासाठी सर्व विभागांनी या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले.
बंधन लॉन्स अहिल्यानगर येथे सेवा सुशासन संघटनात्मक प्रवास सेवा कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी, प्रदेश मुख्यालय प्रभारी रविंद्र अनासपुरे आमदार मोनिकाताई राजळे उत्तर जिल्हा अध्यक्ष नितीन दिनकर दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते बाबासाहेब सानप सुभाष सुधारे अशोक पवार तसेच सर्व जिल्हा पदाधिकारी जिल्हा मोर्चा अध्यक्ष मंडळाध्यक्ष सर्व मंडल मोर्चा अध्यक्ष व आघाडी संयोजक तसेच जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी ऊ सदस्य नगरसेवक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चव्हाण म्हणाले की, शॉप अॅक्ट प्रमाणपत्र, महसूल अडचणी, रोजगार हमी, पानंद रस्ते, तुकडेबंदी, अतिक्रमण, अशा विविध शासकीय विषयांसाठी कॅम्प पद्धतीने सेवा द्यायची आहे. एका ठिकाणी ५० लोक एकत्र करून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा, जिल्हाधिकारी कार्यालयशाही संबधित विषयांबरोबरच शॉप अॅक्ट निरीक्षक, आरोग्य अधिकारी, महिला व बालकल्याण विभाग, महसूल अधिकारी, मेडिकल कॉलेज इ. विभागांना सूचना दिल्या.
नागरिकांच्या अडचणींना त्वरित प्रतिसाद देताना प्रत्येक तालुक्यात महा समाधान शिबिरे भरवून, कमीत कमी ५० हजार अृृनागरिकांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य त्यांनी ठेवले आहे. प्रत्येक गावातील प्रलंबित दाखले, सरकारी कागदपत्रं, स्मशानभूमीवरील अतिक्रमण, पानंद रस्ते अशा विषयांवर सेवा पंधरवड्यात काम करण्याचे त्यांनी आ.चव्हाण यांनी सूचित केले.
चव्हाण म्हणाले की, कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर पक्षाची भूमिका ठामपणे मांडावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नेतृत्वावर विश्वास ठेवूनच त्यांना सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याची संधी देशातील जनतेन दिली.
“केवळ अफवा पसरवून विरोधक काही लोकांना दिशाभूल करतात. त्या खोट्या बातम्या रोखण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी जिगर दाखवून पक्षाची बाजू प्रभावीपणे मांडावी,” असे आ.चल्हाण ठणकावून सांगितले. “तुम्ही पक्षासाठी झोकून द्याल, तर पक्ष तुमच्यासाठी उभा राहतो,” असेही ते म्हणाले.त्यांनी स्पष्ट केलं की हा जिल्हा आधी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता, परंतु गेल्या १० वर्षांच्या मेहनतीतून महायुतीचे १० आमदार निवडून आले आणि आता हा जिल्हा भाजपचा बालेकिल्ला बनला आहे.
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “आमदार मंगेश चव्हाण यांनी योग्य मार्गदर्शन केले. रवीजींनी देखील अतिशय स्पष्ट भूमिका मांडली. मंगेश चव्हाण साहेबांची ही जिल्ह्यातील बहुतेक पहिलीच वेळ आहे, तरी त्यांनी संघटनात्मक पातळीवर उत्कृष्ट भूमिका बजावली आहे. मी त्यांचे जिल्ह्याच्या वतीने मनापासून स्वागत करतो.या सेवा पंधरवड्याच्या माध्यमातून ‘अहिल्यानगर जिल्हा’ हा राज्यात क्रमांक १ वर जाईल, ही माझी खात्री आहे.
आरोग्य विभागाची जबाबदारी मी स्वतः डॉ. विखे पाटील हॉस्पिटलच्यावतीने घेत आहे. आपल्या उद्दिष्टांपर्यंत पोहोचल्याशिवाय आम्ही थांबणार नाही, आशी ग्वाही त्यांनी दिली.
डॉ. विखे पाटील यांनी सभापती शिंदे , आ. मोनिकाताई यांचे विशेष उल्लेख करत सर्वाच्या समन्वयातून काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस हा सेवा उपक्रमाच्या माध्यमातून साजरा होत आहे. त्या निमित्ताने आपण सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे,” असे ते म्हणाले.