शिर्डी (जनता आवाज वृत्तसेवा):- शहरात लक्ष्मीनगर परिसरात गणेश उत्सवाच्या काळात डॉ. सुजय विखे पाटील व त्या प्रभागात राहणाऱ्या माजी नगरसेवक तसेच इतर प्रतिष्ठित व्यक्तींचे फोटो असलेले स्वागताचा बॅनर काही अज्ञात व्यक्तींनी फाडून तसेच त्या परिसरात असलेल्या तीन दुचाकींची नुकसान केल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती.
त्या अनुषंगाने त्या परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिर्डी पोलिसांनी तात्काळ या घटनेचा तपास लावण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजचा आधार घेऊन चार आरोपींना तात्काळ जेरबंद केले मात्र या घटनेचा तपास करत असताना बॅनर फाडणारे तसेच दुचाकींची नुकसान करणारे हे दुसरी तिसरी कोणी नसून पोलिसात फिर्याद देण्यासाठी आलेलेच व्यक्ती असल्चे निष्पन्न झाल्यानंतर या घटनेत फिर्यादीच आरोपी असल्याचा उलगडा पोलिसांना झाल्यानंतर शिर्डीत काही काळ झालेले तणावपूर्ण वातावरण या आरोपींच्या शोधामुळे शांत झाले पोलिसांनी तात्काळ दाखवलेले तत्परतेमुळे नागरिकांनी पोलिसांची कौतुक केले आहे.
याबाबत सविस्तर माहिती लक्ष्मीनगर परिसरात गणेश उत्सवाच्या काळात गणेश भक्तांच्या स्वागतासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ना. राधाकृष्ण विखे पाटील, डॉ सुजय विखे पाटील व माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते, मंगेश त्रिभुवन व प्रतीक शेळके यांचे फोटो असलेले बॅनर लावले होते ते दोन बॅनर व त्या परिसरात उभ्या असणाऱ्या तीन दुचाकी मोटरसायकलची मोडतोड करून एका मोटरसायकल मधील बॅटरी चोरण्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली होती. सदर घटना घडल्याची फिर्याद विशाल राजेश अहिरे येणे शिर्डी पोलिसात दिल्यानंतर पोलिसांनी तपासाचे चक्र वेगाने फिरवल्यानंतर पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की या गुन्हेतील चार आरोपींपैकी फिर्याद देणारा विशाल राजेश आहिरे राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी यानेच याच्या साथीदारासह हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे, त्यामुळे फिर्यादीच आरोपी निघाल्याची जोरदार चर्चा शहरात सुरू झाली. या चार आरोपीपैकी एक आरोपी अल्पवयीन आहे तर यामध्ये मुख्य आरोपी विशाल राजेश आहिरे, दिनेश दवेश गोफने व राकेश सोमनाथ शिलावट सर्वं राहणार लक्ष्मीनगर, शिर्डी यांचा समावेश आहे. सदरचे कृत्य हे त्यांनी त्यांच्या आपापसातील झालेल्या भांडणातून केले असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.
आरोपी यांचा तात्काळ शोध घेण्यासाठी शिर्डी पोलीस स्टेशनचे उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंजीत गलांडे, पोलीस उप निरीक्षक सागर काळे व पोलीस हे कॉ संदिप उदावंत, बाळासाहेब गोराने, केवल राजपूत, शेकडे यांनी केली.