लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धा २०२५ प्रवरा कन्या विद्या मंदिर लोणीच्या संघाच्या मुलीच्या संघाने आर्मी पब्लिक स्कूल नगरचा सेमी फायनलमध्ये ८-० ने पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला अंतिम सामन्यात प्रवरा कन्या च्या संघाने आत्मा मालीक संघावर ६-० असे गोल करत विजयी मिळविला. या संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली अशी माहीती प्राचार्या सौ.विद्या घोरपडे यांनी दिली.
संघामध्ये अक्षरा आघाडे आकांक्षा आमटे, रेवती कानतुटे, प्राची बोरसे, अंजली जाधव,समृध्दी जंगले, प्रांजल अंभोरे,ज्ञानेश्वरी रिंढे, कार्तिकी आमटे, पुनम मिसाळ, आरती शेळके,संस्कृती गायके यांचा समावेश आहे. खेळाडूना क्रिडा अधिकारी सुचिञा तांबे यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, विखे पाटील कारखान्याचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील,
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.



