लोणी (जनता आवाज वृत्तसेवा):-क्रीडा युवक सेवा संचालनालय पुणे , जिल्हा क्रीडा परिषद , जिल्हा क्रीडा कार्यालय,अहिल्यानगर, राहाता तालुका क्रीडा समिती, प्रवरा स्पोर्ट्स अकॅडमी आणि विखे पाटील सैनिक स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय शालेय जलतरण स्पर्धेत लोणी येथील प्रवरा कन्या विद्या मंदिरच्या विद्यार्थिनींनी बाजी मारत ४२ सुवर्णपदके १२ रौप्य पदक आणि १२ कांस्यपदक पटकविले अशी माहीती प्राचार्या सौ.विद्या घोरपडे यांनी दिली.
या विविध वयोगटात झालेल्या गायत्री तोरवणे,रोशनी माने, अमृता वाणी,अनन्या बळी,अनुश्री पांढरे,ईश्वरी पानसरे,विद्या अपसंदे,भक्ती वाघ,सृष्टी जाचक,मृणाली माने, समृद्धी घोगरे,श्रावणी घोगरे,सिद्धी सोंगाडे,प्रांजल देवकर,साक्षी पाटील,आरती क्षीरसागर यांची विभागीय पातळीवर निवड झाली आहे.
यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील, सहसचिव भारत घोगरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ,शिक्षण संचालिका संचालिका सौ. लीलावती सरोदे यांनी अभिनंदन केले आहे.