अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):- नाशिक जिल्ह्यामध्ये अनैंतिक प्रेमसंबंधातुन युवकाचा खुन करणारे आरोपी यांना स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगरकडुन जेरबंद करण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि. 13 रोजी इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर, गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 61(2) प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्यामध्ये फिर्यादी श्री अशोक रामा काळे वय 55,रा. इंदिरागांधी वसाहत क्र. 01, स्टेट बँकेच्या पाठीमागे, शिवाजी चौक, सिडको, नाशिक यांचा मयत मुलगा संतोष अशोक काळे रा. सदर यास त्याची पत्नी पार्वती व तिचा प्रियकर प्रफुल्ल कांबळे अशांनी कट रचुन दगडाने खेचुन खुन केलेला असुन गुन्हा घडल्यानंतर आरोपी प्रफुल्ल कांबळे हा त्याचे साथीदारासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पळुन आलेला होता.
स.पो.नि.हेमंत तोडकर, प्रभारी अधिकारी युनिट 2, गुन्हे शाखा, नाशिक शहर, पो.उपनि.संतोष फुंदे नेम – इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर यांचे पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणेबाबत श्री किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांना कळविले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि/हरिष भोये, पोलीस अंमलदार विष्णु भागवत, किशोर शिरसाठ, सागर ससाणे, फुरकान शेख, प्रशांत राठोड यांचे पथक तयार करुन आरोपीचा शोध घेणेबाबत पथकास सुचना व मार्गदर्शन करुन पथक रवाना करण्यात आले.
पथक दि. 13 रोजी गुप्त बातमीदार व व्यवसायीक कौशल्याचे आधारे आरोपीची माहिती काढत असतांना आरोपी नामे प्रफुल्ल कांबळे हा नवनाथ नगर रोड, बोल्हेगांव गांवठाण या ठिकाणी थांबलेला असल्याची माहिती प्राप्त झाल्याने सदर ठिकाणी जावुन खात्री करता एक इसम संशयीत रित्या थांबलेला असल्याचे दिसले. सदर इसमास ताब्यात घेवुन त्यास त्याचे नांव गांव विचारता त्याने त्याचे नांव प्रफुल्ल दिलीप कांबळे (वय 30 वर्षे, रा. बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर )असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वरील गुन्ह्याबाबत विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने सदर गुन्हा तो तसेच त्याचे साथीदारासह केल्याचे कळविल्याने त्यांचा शोध घेता योगेश बाळासाहेब जाधव, (वय – 23 वर्षे, रा. राममंदीराजवळ, बोल्हेगांव गावठाण, ता. जि. अहिल्यानगर) हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी व विधीसंघर्षीत बालक यांना इंदिरानगर पोलीस ठाणे, नाशिक शहर, गु.र.नं. 283/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 61(2) प्रमाणे गुन्ह्याचे तपासकामी इंद्रनगर पोलीस स्टेशन जि. नाशिक यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास इंदिरानगर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.