श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा):-मध्यप्रदेशमधुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथील 03 गुन्हयांत पाहिजे असलेला आणि विशेषत:दैनिक जय बाबा वृत्तपत्र संपादक व पत्रकार यांना धमकी देणारा आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगरची कारवाई केली आहे.
मा. सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि. किरणकुमार कबाडी, स्थागुशा अहिल्यानगर यांना अहिल्यानगर जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या अभिलेखावरील पाहिजे व फरार आरोपीतांचा शोध घेऊन कारवाई आदेश दिले होते.
पोनि. किरणकुमार कबाडी यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोस.ई समीर अभंग, पो.हेकॉ.फुरकान शेख, पोकॉ. रमीजराजा अत्तार, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड अशांचे पथक नेमून श्रीरामपुर शहर पोलीस ठाणे, गु.र.नं. 757/2025, भारतीय न्याय संहिता 123, 125, 278 प्रमाणे दिनांक 16/08/2025, आणि गु.र.नं. 758/2025 महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्तीहानी प्रसार माध्यम संस्था (हिंसक कृत्य आणि मालमत्तेचे नुकसान किंवा हानी यांना प्रतिबंध) अधिनियम 2017 चे कलम 4 प्रमाणे, दि. 18/08/2025 गुन्हे दाखल असून यातील आरोपी विरुध्द यापूर्वी श्रीरामपूर शहर पो.ठाणे, गु.र.नं. 551/ 2025, भारतीय न्याय संहिता 109, 351(3), 352, 3(5) सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे दाखल 03 गुन्ह्यातील पाहिजे आरोपीचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
दि.12 रोजी गुन्हे शाखेचे पथकाने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथीलवरील पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना पथकास बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, वरील गुन्ह्यातील आरोपी गणेश बाबासाहेब मुंढे रा.स्वप्नगरी, गोंधवणी, श्रीरामपुर हा इटारसी, राज्य मध्यप्रदेश येथे वास्तव्य करत आहे. पथकाने मिळालेल्या माहितीनुसार इटारसी, राज्य मध्यप्रदेश येथे जावुन, व्यावसायिक कौशल्य वापरुन, आरोपीस ताब्यात घेऊन, त्याचे नाव विचारले असता, त्याने त्याचे नाव गणेश बाबासाहेब मुंढे वय-25 वर्षे रा.स्वप्ननगरी, गोंधवणी, श्रीरामपुर असे असल्याचे सांगीतले. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीवर दाखल असलेल्या गुन्हयांची माहिती घेऊन, पडताळणी केली असता, तो वरील 03 गुन्हयांमध्ये पाहिजे असल्याचे निष्पन्न झाले आहे.
ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीस श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथील गु.र.नं. 757/2025, गु.र.नं. 758/2025 गु.र.नं. 551/ 2025 प्रमाणे दाखल गुन्ह्यांचे तपासकामी श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले आहे. पुढील कार्यवाही श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हे करीत आहे.
सदरची कारवाई सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.