पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा): – पारनेर तालुक्यातील विजेसंदर्भातील तातडीच्या समस्या, भारनियमन, आर.डी.एस.एस. योजना कामे, प्रस्तावित सोलर प्रकल्प आदी विषयांवर चर्चा करण्यासाठी आज सोमवारी सकाळी ११ वाजता पारनेर येथील इंदिरा भवनमध्ये “जनता दरबार” आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आ. काशिनाथ दाते सर यांनी दिली.
या जनता दरबारात महावितरणचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, उपकार्यकारी अभियंता, सहाय्यक अभियंते , तालुक्यातील सर्व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना थेट अधिकाऱ्यांसमोर आपले प्रश्न व अडचणी मांडण्याची संधी मिळणार असल्याने या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
तालुक्यातील ज्या नागरिकांना विजेच्या संदर्भात समस्या आहेत, त्यांनी आपली तक्रार लेखी स्वरूपात दरबार सुरू होण्यापूर्वी सादर करावी, अशी माहिती आ काशिनाथ दाते सर यांच्या जनसंपर्क कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.
या दरम्यान विजेच्या विविध प्रश्नांवर प्रभावी चर्चा होऊन ठोस तोडगा निघेल, असा विश्वास व आ . काशिनाथ दाते यांच्या कार्यपद्धती बाबत नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.