संगमनेर (जनता आवाज वृत्तसेवा):–आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 234 व्या जयंती सोहळ्यानिमित्त लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालय मैदानावर भव्य जंगी कुस्त्या होणार असून या कुस्ती कार्यक्रमासाठी बिग बॉस फेम सुरज चव्हाण उपस्थित राहणार आहे. यावेळी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यामध्ये 3 लाख 11 हजार रुपयांकरता पहिली लढत होणार असून मैदानाची जय्यत तयारी सुरू आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचा जयंती सोहळा दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा होतो. कुस्त्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दरवर्षी केले जाते.
यावर्षी यशोधन कार्यालयाच्या मैदानावर रविवारी 5 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 ते रात्री 8 या वेळेत भव्य जंगी कुस्त्या होणार असून पहिली बक्षीस 3 लाख 11000 रुपये करता महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर व पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत होईल तर दुसरे बक्षीस दोन लाख 51 हजार रुपयां करिता बाळू अपराध (सांगली) व समीर शेख (सोलापूर )यांच्यात लढत होईल मोठ्या बक्षिसांच्या दहा लढती होणार असून यावेळी मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके ,माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित दादा तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, अजय फटांगरे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. दुपारी बारा ते तीन या वेळेत भव्य मिरवणूक होणार असून सटाणा येथील प्रसिद्ध बँड स्वर सम्राट हा तरुणांसाठी असणार आहे
यशोधन मैदानावर चार वाजता या जंगी कुस्त्या होणार असून यावेळी झापुक झूपूक या चित्रपटाचा अभिनेता तथा बिग बॉस फिल्म सुरज चव्हाण हा प्रमुख पाहुणा म्हणून उपस्थित राहणार आहे.
तरी या जंगी कुस्त्यांसाठी संगमनेर मधील सर्व नागरिक व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक जयंती उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.



