spot_img
spot_img

शेवगाव नगरपरिषदेची आरक्षण सोडत जाहीर ,महिला उमेदवारांना मोठी संधी! १२ प्रभागांतील आरक्षण निश्चित; अनुसूचित जाती व महिलांना दिला प्राधान्य , राजकीय वातावरणात चुरस वाढली

शेवगाव (जनता आवाज वृत्तसेवा):- शेवगाव नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली असून, एकूण १२ प्रभागांमध्ये महिलांना व अनुसूचित जाती प्रवर्गाला विशेष संधी मिळाली आहे. विविध प्रभागांमध्ये ‘सर्वसाधारण महिला’, ‘अनु.जाती महिला’ तसेच ‘नगरपरिषद राखीव’ अशी विविध आरक्षणे निश्चित करण्यात आली आहेत.

राजकीय वर्तुळात आता चर्चांना वेग आला असून, संभाव्य उमेदवारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे.

प्रभागनिहाय आरक्षण पुढीलप्रमाणे —

१) अ) अनु. जाती (सर्वसाधारण), ब) सर्वसाधारण (स्त्री)

२) अ) ना.पा (स्त्री), ब) सर्वसाधारण

३) अ) सर्वसाधारण (ना.पा), ब) खुला महिला

४) अ) ना.पा (स्त्री), ब) सर्वसाधारण (खुला)

५) अ) अनु. जाती (सर्वसाधारण), ब) सर्वसाधारण (खुला स्त्री)

६) अ) सर्वसाधारण (ना.पा), ब) खुला महिला

७) अ) सर्वसाधारण (स्त्री), ब) सर्वसाधारण

८) अ) सर्वसाधारण (ना.पा), ब) सर्वसाधारण (स्त्री)

९) अ) अनु. जाती (महिला), ब) सर्वसाधारण

१०) अ) अनु. जाती (महिला), ब) सर्वसाधारण

११) अ) सर्वसाधारण (महिला), ब) सर्वसाधारण (खुला)

१२) अ) सर्वसाधारण (ना.पा), ब) सर्वसाधारण (स्त्री)

“आरक्षण सोडतीनंतर राजकीय तापमान वाढले असून सर्वच पक्ष संभाव्य उमेदवारांच्या शोधात सक्रिय झाले आहेत.”

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!