राहाता(जनता आवाज वृत्तसेवा):-राहाता नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी एकूण 10 प्रभागांचे 20 नगरसेवक पदासाठीची प्रभाग निहाय आरक्षण सोडत बुधवार दि. 8 रोजी प्रांतअधिकारी माणिक आहेर व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत नगरपरिषदेच्या कार्यालयात पार पडली आहे या सोडतीनुसार 10 महिला तर 10 पुरुषांना निवडणुकी द्वारे नगरसेवक पदाची संधी मिळणार आहे पुरुष व महिलांना समान जागा आल्याने राहाता पालिकेत पुरुष महिलांचे राजकीय बलाबल समसमान राहणार असल्याचे दिसून येत आहे.
राहाता नगरपरिषदेच्या सभागृहात प्रभाग निहाय आरक्षणाची सोडत बुधवार रोजी पालिकेच्या कार्यालयात प्रांत अधिकारी माणिक आहेर व मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजेनंतर काढण्यात आली यावेळी शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रभाग निहाय निघालेले आरक्षण पुढीलप्रमाणे
प्रभाग क्र. 1 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ब– पुरुष सर्वसाधारण
प्रभाग क्र. 2 अ- अनुसूचित जमाती महिला राखीव ब- पुरुष सर्वसाधारण
प्रभाग क्र 3 अ- अनुसूचित जाती जमाती महिला राखीव ब- पुरुष सर्वसाधारण
प्रभाग क्र 4 अ- अनुसूचित जाती जमाती महिला राखीव ब- पुरुष सर्वसाधारण
प्रभाग क्र 5 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष राखीव ब- महिला सर्वसाधारण
प्रभाग क्र 6 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण पुरुष राखीव ब महिला सर्वसाधारण
प्रभाग क्र 7 अ पुरुष राखीव ब महिला सर्वसाधारण
प्रभाग क्र 8 अ- अनुसूचित जाती सर्वसाधारण पुरुष राखीव ब- महिला सर्वसाधारण
प्रभाग क्र 9 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ब- पुरुष सर्वसाधारण
प्रभाग क्र 10 अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव ब- पुरुष सर्वसाधारण
याप्रमाणे राहाता नगरपरिषदेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडतीमध्ये जाहीर झाले आहे वीस नगरसेवक पदाच्या जागेसाठी दहा जागा महिला तर दहा जागा पुरुष उमेदवारांसाठी असून आता उमेदवारीसाठी इच्छुक असलेल्या पुरुष उमेदवारांच्या प्रभागात पुरुषां ऐवजी महिलेचे आरक्षण निघाल्याने त्यांचे स्वप्न भंगले असून त्या जागी आता पत्नीला उमेदवारी करावी लागेल असे चिन्ह आहे तर काही उमेदवारांच्या बाबतीत ते इच्छुक उमेदवार ज्या प्रवर्गात आहे त्या प्रवर्गाऐवजी त्यांच्या प्रभागात दुसऱ्या प्रवर्गाचे आरक्षण पडल्याने त्यांना आता दुसरा प्रभाग शोधण्याची वेळ येणार आहे.