12.6 C
New York
Monday, October 13, 2025

Buy now

spot_img
spot_img

स्व. अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ नगरमध्ये रंगणार १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान राज्यस्तरीय आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धेचा थरार आ.संग्राम जगताप यांनी केली बॅडमिंटन हॉलची पाहणी

अहिल्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा): – माजी आमदार स्व.अरुणकाका जगताप यांच्या स्मरणार्थ बॅटल डोअर स्पोर्ट्स अॅकॅडमीच्या वतीने अहिल्यानगर शहरात १५ ते १७ वयोगटाखालील मुलामुलींच्या महाराष्ट्र सब -ज्युनियर राज्यस्तरीय आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलमध्ये दिनांक १२ ते १७ ऑक्टोबर दरम्यान या स्पर्धांचा थरार रंगणार आहे. या स्पर्धांचे उद्घाटन रविवार दिनांक १२ ऑक्टोबर रोजी सकळी ९ वाजता शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून स्पर्धक या स्पर्धेत सहभागी होणार असून, उच्च प्रतीच्या खेळाचा थराराचा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

महाराष्ट्र राज्य बॅडमिंटन असोसिएशन व अहिल्यानगर बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने होणाऱ्या या स्पर्धांच्या नियोजनासाठी आ.संग्राम जगताप यांनी शुक्रवारी सायंकाळी वाडियापार्क येथील बॅडमिंटन हॉलची पाहणी केली. यावेळी प्रभारी जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे, स्पर्धेचे संयोजक मिलिंद कुलकर्णी व मल्हार कुलकर्णी, ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक संजय धोपावकर, जिल्हा संघटनेचे खजिनदार राहुल मोटे, विशाल गर्जे, ऑलिम्पिक असोसिएशनचे शैलेश गवळी, ज्ञानेश्वर रासकर, अजय भोयर, अजय कविटकर आदी यावेळी उपस्थित होते.

आ.संग्राम जगताप म्हणाले, अहिल्यानगरमध्ये राज्यस्तरीय आंतर जिल्हा बॅडमिंटन स्पर्धा होत असल्याचा आनंद होत आहे. या स्पर्धेतून राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्याच्या संघाची निवड होणार असल्याने या स्पर्धा खूप महत्वाच्या आहेत. या स्पर्धा उत्कृष्टपणे व्हाव्यात यासाठी सर्व नियोजन करत आहोत. नगरमध्ये क्रियाशील क्रीडा संघटनांच्या चांगल्या कामांमुळे अनेक खेळाडू घडत आहेत. असेच अजून चांगले खेळाडून निर्माण व्हावेत यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त असतात. या खेळाडूंना जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न आहे.

मिलिंद कुलकर्णी यांनी स्पर्धेची माहिती देतांना सांगितले की, शहरात होणाऱ्या राज्यस्तरीय आंतरजिल्हा बॅडमिंटन स्पर्धांना रविवारी सकाळी सुरवात होणार आहे. या स्पर्धेत राज्यातून मुलांचे २६ तर मुलींचे २४ संघ सहभागी झाले आहेत. वैयक्तिक स्पर्धेत ८५० मुलामुली खेळाडूंचा सहभाग आहे. या स्पर्धा मुले मुली एकेरी, दुहेरी, मिक्स डबल अशा गटांमध्ये होणार आहेत. या स्पर्धेतील आंतरजिल्हा स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे. तर वैयक्तिक स्पर्धेचा परितोषिक वितरण समारंभ १७ ऑक्टोबर रोजी होणार आहे. ही स्पर्धा युनिक्स व सनराईज या कंपन्यांनी प्रायोजित केली आहे.

 

 

 

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!