श्रीरामपूर(जनता आवाज वृत्तसेवा):- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत आज एका मोठ्या राजकीय नेत्यांनी प्रवेशामुळे राजकीय मोठी घडामोड घडली आहे.. भारतीय जनता पार्टीतील जुना चेहरा आणि प्रदेश ओबीसी सेलचे माजी उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे. ही घोषणा शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत दुपारी निश्चित करण्यात आली असून, यामुळे श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता आहे. प्रकाश चित्ते यांच्या शिंदे गटात प्रवेशमुळे भाजपाला श्रीरामपूरमध्ये मोठा झटका बसला आहे.
प्रकाश चित्ते हे भाजपमधील प्रभावशाली हिंदुत्ववादी नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेश सोहळ्यात शिवसेनेचे तालुका संपर्कप्रमुख जनार्दन गालपगार, सुनिल मुथा, संजय पांडे, राजेंद्र कांबळे आणि माजी नगरसेवक किरण लुनिया उपस्थित होते. या प्रवेशामुळे शिंदे गटाला ओबीसी मतदारसंघात मजबूत आधार मिळेल असे श्रीरामपूरमध्ये चर्चाला उधाण आले आहे.
शिंदे गटाची श्रीरामपूरमध्ये ताकद वाढली
गेल्या काही दिवसापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, माजी उपनगराध्यक्ष संजय छल्लारे यासारखे मातंबर नेते शिंदे गटात सामील झाल्यामुळे श्रीरामपूर मध्ये शिंदे गटाची ताकद वाढली असून श्रीरामपूरचा नगराध्यक्ष हा शिंदे गटाचा होईल असे चित्र निर्माण झाले आहे.