नेवासा (जनता आवाज वृत्तसेवा) : –तालुक्यातील प्रत्येक शेती गटाला मजबूत रस्त्यांच्या माध्यमातून जोडून संपूर्ण तालुक्यात रस्त्यांचे जाळे निर्माण करणे हा आमचा संकल्प असल्याचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री ग्रामसमृद्धी शेत, पाणंद रस्ते योजनेत पहिल्या टप्प्यात ४५ आणि दुसऱ्या टप्प्यात ३०, असे एकूण ७५ शेतरस्त्यांना मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
या मंजुरीसाठी आमदार लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश आले असून, पहिल्या टप्प्यात ४५ रस्त्यांना आणि अवघ्या महिन्याभरात दुसऱ्या टप्प्यात आणखी ३० रस्त्यांच्या मजबुतीकरणास मान्यता मिळाली आहे.
या दोन्ही टप्प्यांत मिळून सुमारे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, मनरेगा योजनेअंतर्गत एकूण ७५ किलोमीटर लांबीचे शेतपाणंद रस्ते तयार होणार आहेत.
चांदा, म्हाळसपिंपळगाव, अंमळनेर, गोणेगाव,गोपाळपूर, माळीचिंचोरा कौठा,सोनई, शिंगवे तुकाई, शिरसगाव, निंभारी,शिरेगाव, धामोरी बहिरवाडी सुलतानपूर, पिचडगाव, गणेशवाडी, नेवासा खुर्द, घोगरगाव, फत्तेपूर,सुकळी, बऱ्हाणपूर,पानेगाव,गिडेगाव, गोधेगाव, धनगरवाडी (खामगाव ), बेलेकर वाडी, भालगाव,गोपाळपुर, तमासवाडी, निपाणी निमगाव, हंडी निमगाव, बाभुळवेढा, लोहगाव, तेलकुडगाव, उस्थळ दुमाला, जळके खुर्द, पिंपरी शहाली, चिलेखनवाडी, बेलपांढरी,, कुकाना, पानसवाडी, वडाळा, नेवासा बुद्रुक, पुनतगाव, रस्तापूर, , लाखेफळ, राजेगाव, टोका, अशा ४९ गावांचा यामध्ये समावेश आहे. पुढील काळातही आपल्याला तिसरा टप्पा ही लवकरच मिळणार आहे. त्यामुळे उर्वरित गावांचा यामध्ये सामावेश असणार आहे
या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात जाण्यासाठी सुलभ मार्ग उपलब्ध करून देणे शेतातील मालाची सुरक्षित आणि जलद वाहतूक करणे सुलभ होणार आहे
“रस्त्यांशिवाय गावाचा विकास शक्य नाही; त्यामुळे रस्त्यांचे जाळे हेच विकासाचे खरे माध्यम ठरणार आहे,” असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे यांनी केले.