14.3 C
New York
Friday, October 24, 2025

Buy now

spot_img
spot_img

नगरपालिका निवडणुकीत श्रीरामपुरात लवकरात राजकीय भूकंप – डॉ.सुजय विखे पा. पालकत्व स्विकारले, गुन्हेगारी मुक्त श्रीरामपूर करणार

श्रीरामपूर (जनता आवाज वृत्तसेवा) :- श्रीरामपूर शहर आणि तालुक्याला नेतृत्वाच्या चेहऱ्याचा अभाव असल्याने शहराचा आणि तालुक्याचा विकास मागे पडला आहे विधानसभेला नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली स्वर्गीय ससाने यांच्या नंतर चेहरा निर्माण होऊ शकला नाही त्याचा परिणाम शहर आणि तालुक्याच्या विकासावर झाला आहे मात्र आगामी नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपा आणि महायुतीची सत्ता आल्यानंतर श्रीरामपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण करणार आहोत त्यासाठी श्रीरामपूरचे पालकत्व आपण स्वीकारले आहे आणि आजपासूनच त्या कामाला सुरुवात देखील केली आहे. गुन्हेगारीमुक्त श्रीरामपूर करण्याचा निर्धार आपण केला असून लवकरच श्रीरामपुरात राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच  डॉ. सुजय विखे यांनी केले.

आगामी नगरपालिका पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या बैठका पार पाडल्या .ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक उत्सव मंगल कार्यालयात झाली तर शहरातील आजी-माजी नगरसेवकांसह कार्यकर्त्यांची बैठक लक्ष्मीनारायण हॉटेल येथे झाली त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. विखे बोलत होते .

एवढी व्यासपीठावर माजी सभापती दीपक पटारे,माजी नगराध्यक्ष संजय फंड, भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य शरद नवले,अभिषेक खंडागळे, पूजा चव्हाण आदि उपस्थित होते.

पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देताना डॉ. विखे पुढे म्हणाले की श्रीरामपूर शहराच्या विकासाचा आम्ही निर्धार केला आहे. शहरात महायुती झाल्यास उत्तमच. नाही झाल्यास आम्ही आमचा चेहरा घेऊन मतदारांसमोर जाणार आहोत. श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी जो जाहीरनामा पुढच्या पाच वर्षासाठी आम्ही तयार करणार आहोत त्यामध्ये शहराच्या विकासाचा संपूर्ण आराखडा आम्ही देणार आहोत.

श्रीरामपुरात भाजपकडून संजय फंड आणि श्रीनिवास बिहानी या दोन नावांची नगराध्यक्ष पदासाठी चर्चा असल्याचे सांगितले असता त्यांनी श्रीरामपुरात राजकीय भूकंप झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका,राजकीय भूकंप होणार आणि तो झाल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी निक्षून सांगितले.

शहरातील अतिक्रमण धारकांचे पुनर्वसन करण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल या सर्वांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत विस्थापितांना पुनर्वशीत करण्यासाठी शेती महामंडळाच्या जागेमध्ये शॉपिंग कॉम्प्लेक्स नगरपालिका नवीन बिल्डिंग नवीन बस स्टॅन्ड नवीन स्टेडियम इत्यादी सर्व तरतुदी आपण केले आहेत शहराच्या शासकीय जागा आहेत त्यांचा मूल्यांकन जास्त असल्यामुळे त्या जागा आपल्याला मिळतीलच असं नाही परंतु शहरासह उपनगरे देखील विकसित झाली पाहिजे ज्याप्रमाणे अहिल्यानगरमध्ये केडगाव बोलेगाव आधी ठिकाणी आपण विकास कामांना सुरुवात केली आहे त्याच धर्तीवर श्रीरामपूर देखील काम करणार आहोत

नगरपालिकेमध्ये जर आमची सत्ता आली तर केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजना आपण कार्यान्वित करू ब्युटी तर धोरणावर बस स्टँडचा विकास होऊ शकेल मुख्यमंत्र्यांना विनंती करून आपण त्यासाठी विशेष निधी मिळवू .

शहरामध्ये महायुती होणार का या प्रश्नावर बोलताना त्यांनी महायुती करण्याची आमची इच्छा आहे. मात्र मित्र पक्षातील नेमकं कोणाशी बोलायचं हा मोठा प्रश्न आहे. कारण माहितीच्या इतर मित्र पक्षांमध्ये शहरात अनेक गट आहेत .त्यासाठी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नेमकी चर्चा कुणाशी करायची याचा शोध घ्यावा लागेल असे सांगून महायुतीसाठी मी कुणाच्याही दारावर जायला तयार आहे. जे आमच्यातून गेले त्यांच्यावर टीका टिप्पणी करण्यात जास्त रस नाही. मी कुणाचाही द्वेष करीत नाही. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असे त्यांनी सांगितले.

श्रीरामपूर साठी आम्ही नवीन रणनीती तयार केली आहे. निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांना तिकीट देऊ. अनेक नगरसेवक आमच्या पक्षात आले. अजूनही काही येणार आहेत. त्यांना सुद्धा सामावून घेऊ. शिर्डीप्रमाणे श्रीरामपूर शहरांमध्ये महा सिक्युरिटी योजना राबवू. सुरक्षा कर्मचारी नियुक्त करू शहरांमध्ये गुन्हेगारीचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. वर्षभरात त्याचा बिमोड करू आणि शहर साफ करू असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला. एमएसएफ नियुक्त करताना शिर्डी प्रमाणे घराघरातून सर्वे करण्यात येईल आणि नागरिकांच्या मतानुसार पुढील कारवाई करण्यात येईल. कडू औषध हळूहळू द्यावे लागते असे त्यांनी सांगितले.

राजकीय भाष्य करताना श्रीरामपुरात लवकरच राजकीय भूकंप होणार आहे आणि हा भूकंप सर्वांना सामावून घेणारा असेल असेही ते म्हणाले.

शहरामध्ये अनेक इच्छुक लोक फिक्स नगरसेवक, भावी नगरसेवक असे बोर्ड लावत असल्याचे त्यांना विचारले असता बोर्ड लावून किंवा फराळ वाटले म्हणून तिकीट मिळेल असे नाही. भावी शब्द ज्यांनी लावला ते संपले असे मुश्किलपणे त्यांनी सांगितले. फ्लेक्स बोर्ड बंदीचा विषय आला असता भविष्यात याबाबत निश्चितपणे आपण धोरण राबवू .शहराच्या विकासासाठी जनता जनार्दनाने आम्हाला कौल द्यावा . श्रीरामपूरचा नियोजनबद्ध विकास करण्याची जबाबदारी आमची आहे . पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा हा विषय आपण सोडवला आहे . नजीकच्या काळामध्ये शहराचा नियोजनबद्ध विकास होण्यासाठी अनेक योजना आपल्याकडे आहेत . त्यासाठी शहरातील मतदारांनी आम्हाला साथ द्यावी असे आवाहनही त्यांनी केले .

अहिल्यानगरमध्ये दिवाळीच्या पार्श्वभूमीवर काही दुकानदारांनी भगवे झेंडे लावले होते त्याबाबत प्रश्न विचारला असता धर्माच्या आधारावर मते मागण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यावर मतदान व्हावे याला आपण नेहमी प्राधान्य दिले आहे . लोकसभेला ठराविक समाजाने वेगळा निर्णय घेतला त्याची प्रतिक्रिया विधानसभेला उमटली . आता हे कुठे तरी थांबवण्यासाठी सुरुवात ज्यांनी केली अंतही तेच करू शकतात असे ही त्यांनी सांगितले.

जे लोक पक्षाला सोडून गेले आहेत त्याबाबत बोलताना त्यांनी सांगितले की जे गेले त्यांचे आमच्या पक्षासाठी निश्चितपणे योगदान होते . मला त्यांचे बद्दल आदर आहे . माझ्यावर कुणी किती जरी टीका केली तरी मी मात्र त्याबाबत नाराज नाही .मात्र भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली शहराचा विकास होणार असेल तर त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत असेही ते म्हणाले.

मी नियोजनपूर्वक काम करीत असतो . कागदावर आराखडा तयार करतो आणि त्याप्रमाणे कार्यवाही करीत असतो . श्रीरामपूर साठी देखील आम्ही आराखडा तयार करीत आहोत . एक वर्षभरामध्ये श्रीरामपूर स्वच्छ करण्याचे आश्वासन मी तुम्हाला देत आहे.श्रीरामपूरचे पालकत्व स्वीकारण्याचा निश्चय करूनच मी आजची पत्रकार परिषद घेत आहे असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!